Pune Accident : डॉक्टरला 3 लाखांची लाच देणाऱ्याला अटक; पुणे पोलिसांची कारवाई

दिव्येश सिंह

• 03:39 PM • 27 May 2024

Sassoon Hospital Peon arrested by police : पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली. ज्या डॉक्टरने अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले त्याला या आरोपीने ३ लाख रुपये लाच दिल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांच्यातील मध्यस्थ व्यक्तीला अटक.

पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे अपघात प्रकरणात आणखी एकाला अटक

point

ससून रुग्णालयातील शिपायाला पोलिसांनी केली अटक

point

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Accident Case Update : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी एकाला अटक केली आहे. ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर याला ३ लाखांची लाच दिल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime Branch has Arrested Peon of Sassoon Hospital)

हे वाचलं का?

पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्व यंत्रणाचे कामाला लागल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाचे धागेदौरे ससून रुग्णालयापर्यंत पोहोचले आहेत.

पुणे गुन्हे शाखा पोलिसांनी पोर्श कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना सोमवारी अटक केली. 

हेही वाचा >> आरोपीच्या रक्ताचे नमुने फेकले कचऱ्याच्या डब्यात, डॉ. तावरे कसा फसला?

या अटकेनंतर काही वेळातच पोलिसांनी ससून रुग्णालयातील आणखी एका व्यक्तीला अटक केली. अमित घटकांबळे असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यानेच श्रीहरी हळनोर याला लाच दिल्याचा आरोप आहे.

 

तावरेकडून ३ लाख घेतले आणि हळनोरला दिले

मिळालेल्या माहितीनुसार अमित घटकांबळे यांने डॉ. अजय तावरे याच्याकडून तीन लाख घेऊन ते श्रीहरी हळनोर याला नेऊन दिले. हळनोरला तावरेने अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलायला सांगितले होते. 

    follow whatsapp