Pune Hit and Run : पुणे हादरले! इनोव्हाने उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

मुंबई तक

08 Jul 2024 (अपडेटेड: 08 Jul 2024, 03:24 PM)

Pune Hit and Run News : पोर्शे कार हिट अँड रन घटनेची चर्चा थांबत नाही, तोच पुण्यात आणखी एक अशीच घटना घडली आहे. यात पोलिसाचा जागेवरच मृत्यू झाला.

पुण्यात गस्तीवर असलेल्या बीट मार्शल्सना कारने उडवल्याची घटना घडली आहे.

पुण्यात एका कारने पोलिसांना उडवल्याची घटना घडली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात हिट अँड रनची आणखी एक घटना

point

गस्तीवर असलेल्या बीट मार्शलचा जागीच मृत्यू

point

इनोव्हा कारने पोलिसांना उडवले

Pune Hit and Run Latest News : (ओंकार वाबळे, पुणे) कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर आणखी एका घटनेने पुणे हादरले आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना इनोव्हा कारने उडवले. यात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. (Beat marshal died in innova hit and run case in pune)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात पोलीस बीट मार्शल गस्तीवर होते. समाधान कोळी हे सहकाऱ्यांसोबत रविवारी (७ जुलै) मध्य रात्री गस्त देत असतानाच ही दुर्घटना घडली.

हेही वाचा >> पावसाने मुंबई धरली वेठीस! लोकल रखडल्या, रस्ते पाण्याखाली

दुचाकीरवरून गस्त घालत असतानाच एका भरधाव कारने दोन बीट मार्शलला उडवले. ही धडक इतकी जोरात होती की, यात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. समाधान कोळी असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलिसावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >> "माझी बायको चाकाखाली, तो...", पती ढसाढसा रडला, सांगितलं काय घडलं?

धडक दिलेली कार इनोव्हा होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना धडक दिल्यानंतर कारचालक घटना स्थळावरून फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आता त्या कार आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे. 

बिल्डरच्या मुलाने घेतला दोघांचा जीव

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भयंकर घटना घडली होती. बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलाने अंदाधूंद पोर्श कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. 

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या वडील, आजोबासह इतर काही जणांना अटक केली होती. यातील काही जण जामिनावर सुटले आहेत. ही घटना विस्मृतीत जात नाही, तोच पुण्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. 

    follow whatsapp