Pune Accident: पोर्श कार अपघात प्रकरणी 'त्या' पोलिसांवर प्रचंड मोठी कारवाई!

मुंबई तक

• 10:12 PM • 24 May 2024

Pune Accident 2 Police Suspend: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाची योग्य वेळेत वरिष्ठांना माहिती न दिल्याचा ठपका ठेवत दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं

दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं

follow google news

Pune porsche car accident: पुणे: पुणे पोर्श अपघात प्रकरणी तपासानंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हे तेच दोन अधिकारी आहेत, जे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले होते, मात्र त्यांनी या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना आणि नियंत्रण कक्षाला दिली नाही. (pune porsche car accident huge action against two policemen in case of accident)

हे वाचलं का?

दोन पोलीस अधिकारी निलंबित

येरवडा पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना पुणे आयुक्तांनी निलंबित केले आहे. 19 मे रोजी झालेल्या अपघाताची वरिष्ठांना वेळेवर माहिती न दिल्याने पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि एपीआय विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आले होते.

झोन-१ चे डीसीपीही नाईट राउंडवर?

पुणे पोर्श प्रकरणी पोलिसांचा सर्वात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. पोर्श कारने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते, मात्र त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली नाही. याप्रकरणी या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे आधीच बोलले जात होते. यावेळी झोन-१ चे डीसीपी गिल हेही नाईट राउंडवर होते, असे बोलले जात आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती न दिल्याने त्यांना या अपघाताची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 

पिझ्झा आणि बर्गर सर्व्ह केल्याचा आरोप फेटाळला

तत्पूर्वी, एका पत्रकार परिषदेत पुणे एसपींनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या दाव्यावर स्पष्टपणे सांगितले होते की, अल्पवयीन आरोपीने घराबाहेर कार नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. यासोबतच घटनेनंतर कोठडीत असताना अल्पवयीन मुलाला पिझ्झा आणि बर्गर खायला दिल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.

अल्पवयीन कार चालवत नव्हता?

ते म्हणाले की, 'असं दाखविण्याचा  प्रयत्न करण्यात आला की, घटनेच्या वेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता, त्याच्या जागी दुसरा कोणीतरी गाडी चालवत होता. त्यामुळे आम्ही ड्रायव्हरवर पुरावे नष्ट करण्यासाठी एफआयआरमध्ये कलम 201 जोडणार आहोत. आम्ही याचाही तपास करू की, ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली असा जबाब दिला आहे.'

काय प्रकरण आहे?

ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शने चिरडले, त्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला.

न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला होता. मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अल्पवयीन बाल सुधारगृहात आहे.

अल्पवयीन व्यक्तीवर प्रौढ म्हणून कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, 'अल्पवयीन आरोपीवर प्रौढांप्रमाणेच खटला चालवावा. यासाठी पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.' अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केल्याच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी हे वक्तव्य केलं आहे.

ते म्हणाले की, 'आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 304 (हत्येचे प्रमाण नसून अपराधी हत्या), 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
 

    follow whatsapp