Punjab Viral Video man beaten Sick Mother : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलाने वृद्ध आईला अमानुष मारहाण करून छळ केल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर मुलासोबत सुन आणि नातवाने देखील महिलेला बेदम मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या घटनेनंतर वृद्ध महिलेच्या मुलीने तिच्याच भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (punjab viral video man brutally beaten hi 75 year old sick mother shocking story)
ADVERTISEMENT
पंजाबच्या (Punajb) रूपनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. रोपडे ज्ञानी जैल सिंह नगरमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिला आशा वर्मा तिचा मुलगा अंकुर शर्मा त्याची बायको आणि मुलासोबत राहत होत्या. मात्र आशा वर्मा यांचा मुलगा अंकुर शर्माने अक्षरश छळ मांडला होता.अंकुर आईला बेदम मारहाण करायचा. कधी तिचा गळा दाबायचा, तर कधी डोकं पकडून आपटायचा. तर कधी पाठीत बुंके घालायचा. या छळात अंकुरच्या बायकोचा आणि मुलाचाही समावेश असायचा.
हे ही वाचा : Ajit Pawar Health : अजित पवारांना डेंग्यू, प्रफुल्ल पटेलांनी काय दिली माहिती?
दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती मुलगी दीपशिखाला होती. मात्र तिच्याकडे भाऊ अंकुर विरोधात पुरावे नव्हते, त्यात तो वकीलही होता. त्यामुळे दीपशिखाने वृद्ध आईला भेटण्याच्या बहाणे जाऊन घरात एक छुपा कॅमेरा लावला होता. या कॅमेरात भावाचे अमानवीय कृत्य कैद झाले होते.
व्हिडिओत काय?
2ऑक्टोबरला पहिली घटना कॅमेरात कैद झाली होती. या घटनेत आशा वर्मा बेडवर झोपल्या आहेत. इतक्यात मुलगा अंकुर वर्मा येतो आणि आईला बेदम मारहाण सुरु करतो. आईचे केस ओढतो, डोकं आपटतो तिच्या कानशिलात लगावतो, अशाप्रकारचा तो छळ मांडत असल्याची घटना कॅमेरात कैद झाली होती. दुसऱ्या व्हिडिओत अंकुरचा मुलगा आणि पीडित महिलेचा नातू बेडवर स्वत:च पाणी आततो आणि वडिलांकडे आजीने लघवी केल्याची तक्रार करतो.या तक्रारीनंतर अंकुर आईला बेडवर धक्का देऊन आपटतो आणि अमानुष मारहाण करतो. पंजाबचा पत्रकार गगनदीप सिंहने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हे सर्व पुरावे हाती आल्यानंतर दीपशिखा भाऊ अंकुरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करते. तसेच दीपशिखाने लुधियाना येथील सामाजिक कार्यकर्ता गुरप्रीत सिंग यांच्याकडेही मदत मागितली. गुरप्रीत त्याच्या टीमसोबत दीपशिखाच्या आईच्या घरी पोहोचते आणि तिथून तिची सुटका करून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करते.
हे ही वाचा : NCP : ‘अपात्र का करू नये?’, शरद पवारांच्या 8 नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार!
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वकील अंकुर वर्माविरुद्ध भादंवि कलम 327 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर अंकुरला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. अंकुरची पत्नी आणि मुलाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिसांचे सांगितले आहे.
ADVERTISEMENT