Rain Alert: महाराष्ट्रात 'या' भागात अतिमुसळधार, तुमच्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस?

रोहिणी ठोंबरे

26 Jun 2024 (अपडेटेड: 26 Jun 2024, 06:31 PM)

Maharashtra Weather Updates : मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभाने वर्तवली आहे. IMD ने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbaitak
follow google news

Maharashtra Weather Updates : मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभाने वर्तवली आहे. IMD ने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरणामुळे गरमी वाढली तर काही ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू आहे. मात्र, जोरदार पावसाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. (Rain Alert Heavy rain in this area of Maharashtra how will the rain be in your district know weather update)

हे वाचलं का?

महाराष्ट्रात कोणत्या भागात अतिमुसळधार पाऊस बरसणार? 

मुंबईत गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. तर, दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi : सात गोष्टींसाठी मोदींना घ्यावी लागणार राहुल गांधींची संमती

ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ठाकरेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं, चेंबूरची जागा कशी राखणार?

पण, यासर्वात खेड्या-पाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असेही आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी वर्ग चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

    follow whatsapp