Rajouri Encounter Agra’s Martyred Captain Shubham Gupta : जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) राजौरी (Rajouri Encounter) जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी (कॅप्टन) आणि दोन जवान शहीद झाले आहेत. यामधील एक असलेले आग्र्याचे कॅप्टन शुभम गुप्ता (Captain Shubham Gupta) यांचे नुकतेच लग्न ठरलं होतं. घरात या लग्नाची धुमधडाक्यात तयारी देखील सूरू होती.मात्र त्याआधीच शुभम गुप्ता यांना सीमेवर वीरमरण आले आहे. या घटनेने शुभम यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (rajouri encounter agra son shubham gupta martyred rajouri attack family prepare for wedding)
ADVERTISEMENT
आग्र्याचे सुपूत्र असलेले शुभम गुप्ता हे राजौरीच्या बाजीमल परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. शुभम यांचे कुटुंब त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. या लग्नासाठी घरातले खुप उत्सुक होते आणि यासाठी तयारी देखील सुरु होती. या तयारी दरम्यानच शुभम गुप्ता सीमेवर शहीद झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कळताच शुभमची आई बेशुद्ध झाली आहे, तसेच घरातल्या इतर कुटुंबियांवर देखील धक्का बसला आहे.
हे ही वाचा : ‘नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय?’, ठाकरेंच्या सेनेच्या पलटवार, बावनपत्ती’ म्हणत…
वर्दीची होती प्रचंड आवड
भावाला सिग्नल कोरमध्ये कमिशन मिळाले होते. तरी त्याने सिग्नल कोर सोडून पॅरा जॉईन केले होते. तसेच जेव्हा ही तो सिक्रेट मिशनवर जायचा, तेव्हा त्याचा फोन बंद यायचा. देशाप्रती असलेली त्याची तळमळ विलक्षण होती. शहीद कॅप्टन शुभम यांच्या मनात सुरुवातीपासूनच देश आणि लष्कराविषयी एक वेगळीच भावना होती. शुभमला लहानपणापासूनच वर्दीची खूप आवड होती, अशी प्रतिक्रिया शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांचे भाऊ ऋषभ गुप्ता यांनी दिली आहे.
सर्च ऑपरेशन दरम्यान चकमक
जम्मू काश्मीरच्या राजौरीत बुधवारी दहशतवाद्यांची भारतीय जवानांनी चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. या शहीद जवानांमध्ये शुभम गुप्ता यांचाही समावेश आहे. राजौरीत भारतीय जवानांना दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. यावेळी त्या ठिकाणा दोन आतंकवादी होते.
हे ही वाचा : Maharashtra Crime : धुळे हादरलं! 22 वर्षीय तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
सर्च ऑपरेशन दरम्यान धर्मसालच्या बाजीमल परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन कॅप्टन आणि जवान शहीद झाले होते. या सर्च ऑपरेशन दरम्यान लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह पॅराट्रूपर्सचाही सहभाग होता. यावेळी दहशतवादी घात लावून बसले होते, आणि त्यांनी ताबडतोब केलेल्या गोळीबारात जवांनाना वीरमरण आले.
ADVERTISEMENT