Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यासाठी अयोध्या (Ayodhya) नगरीतील प्रत्येक कोपरान् कोपरा सजवला जात आहे. राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी केली जात असल्यामुळेच त्याची जोरदार चर्चाही होऊ लागली आहे. त्यातच ज्या राम मंदिरातील गर्भगृहामध्ये फक्त 5 लोकांचा सहभाग असणार आहे. राममंदिरातील त्या गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), राज्यपाल आनंदीबेन पटेल (Governor Anandiben Patel), मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत व त्यांच्यासोबतच मुख्य पुजारी उपस्थित राहणार आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Z+ Security म्हणजे काय आणि ती कोणाला दिली जाते?
राम मंदिराबाबत दिलेल्या माहितीनुसार राम मंदिर ट्रस्टची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नृपेंद्र मिश्रा, चंपत राय, वासुदेवानंदर सरस्वती, स्वामी परमानंद, राजा अयोध्या, विमलेंद्र मोहन मिश्रा आणि महंत जिनेंद्र दास उपस्थित राहणार आहेत.
योगी करणार पाहणी
तर त्यातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बरोबरच गृह खात्याचे सचिव संजय प्रसादही उपस्थित होते. तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा ताफा हनुमानगढी रामजन्मभूमीकडे रवाना झाला आहे. या दौऱ्यामध्ये योगी राम मंदिराच्या उभारणीचीही पाहणी करणार आहेत. त्याच बरोबर रामजन्मभूमीबरोबरच भक्तिमार्गाचीही ते पाहणी करणार आहेत. तर यावेळी मुख्यमंत्री योगी यांच्याकडून अयोध्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशन व सार्वजनिक सभेच्या ठिकाणाचीही पाहणी करणार आहेत.
सोहळा प्राणप्रतिष्ठापणाचा
राम मंदिरातीलहा प्राणप्रतिष्ठापणाचा सोहळा सात दिवस चालणार असून तो 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 16 जानेवारी रोजी विष्णूपूजा आणि गाय दान केली जाणार आहे. तर 18 जानेवारी रोजी गणेशाची पूजा केली जाणार आहे. या समारंभाबरोबरच त्याच वेळी वरुण देवपूजा आणि वास्तूपूजाही केली जाणार आहे. 16 जानेवारी रोजी हवन अग्नी समारंभ असणार आहे. त्यानंतर 20 जानेवारी रोजी वास्तुपूजा केली जाणार आहे. त्यानंतर 21 जानेवारी रोजी रामच्या मूर्तीला नद्यांमधील पवित्र पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे. तर 22 जानेवारी रोजी मात्र भव्यदिव्य अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.
मुहूर्त 84 सेकंदांचा
अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी 84 सेकंदांच्या मुहूर्तावर अभिषेकाचा कार्यक्रम असणार आहे.यावेळी रामलल्ला हा अभिषेक घातला जाणार आहे. 84 सेकंदांचा मुहूर्त काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी निवडला आहे.
ADVERTISEMENT