Rashmi shukla New DGP of maharashtra : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi shukla) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ (rajnish seth) यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आता त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या डीजीपीपदी नियुक्ती झाली आहे. रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणांमुळे वादात सापडल्या होत्या. (rashmi shukla become dgp of maharashtra state rajnish seth will be mpsc chairman)
ADVERTISEMENT
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची चौकशी सुरु केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती.
हे ही वाचा : ‘5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य वास्तववादी’, PM मोदींनी उदाहरणं देऊन स्पष्टच सांगितलं
दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टँपिंगच्या प्रकऱणातील त्यांच्या विऱोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगचे दोन बेकायदेशीर खटले फेटाळून लावले होते. मुंबईतील पहिल्या एफआयआरमध्ये शिवसेनेचे (UBT) नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदेशीररीत्या फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
पुण्यातील दुसऱ्या एफआयआरमध्ये त्यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप झाला होता. इतकंच नाही तर काही पोलिस अधिकाऱ्यांच्या पैशासाठी बदल्या आणि पोस्टिंग ऑफर करणारे मध्यस्थ यांच्यातील संबंध उघड करणारा एक वर्गीकृत अहवाल लीक केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच 2020 मध्ये SID च्या आयुक्त असताना त्यांनी एक गोपनीय अहवाल लीक केला होता. रश्मी शुक्ला यांनी हे आरोप फेटाळून लावत राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेच्या हितासाठी काम केल्याचा दावा केला होता.
ADVERTISEMENT