Ratnagiri : लग्न घरातून वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा! हळदीला जाताना घडला अनर्थ

मृत तरूण अंकित हा मुळचा मुंबईचा रहिवाशी होता. त्याचे आई-वडील आणि तो नोकरी धंद्यानिमित्त वास्तव्यास होते. तसेच अंकित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता

ratnagiri accident news a rickshaw tempo hit two wheeler boy killed khed accident news

ratnagiri accident news a rickshaw tempo hit two wheeler boy killed khed accident news

प्रशांत गोमाणे

22 Nov 2023 (अपडेटेड: 22 Nov 2023, 05:06 AM)

follow google news

Ratnagiri Accident News : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुंबईवरून मावस भावाच्या लग्नासाठी गावी आलेल्या तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. अंकीत तांबे (23) असे या मृत तरूणाचे नाव आहे. अंकित हा हळदी समारंभासाठी दुचाकीने जात होता, यावेळी भरधाव रिक्षाने (Rikshaw) त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यु झाला. खेड (Khed) तालुक्यात कुंभाड ते खोपी या मार्गावर हा अपघात घडला. या घटनेने लग्नघरात आणि कुंभाड परिसरात शोककळा पसरली आहे. (ratnagiri accident news a rickshaw tempo hit two wheeler boy killed khed accident news)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहिती, मृत तरूण अंकित हा मुळचा मुंबईचा रहिवाशी होता. त्याचे आई-वडील आणि तो नोकरी धंद्यानिमित्त वास्तव्यास होते. तसेच अंकित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अंकित तांबे चार दिवसांपूर्वीच मुंबई येथून आपल्या मावस भावाच्या लग्नासाठी गावी आला होता. यानिमित्त हळदी समारंभासाठी आयनी मेटे येथे दुचाकीने जात असताना रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला. अंकितच्या अपघाती मृत्यूने कुंभाड परिसरातून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : MLA Disqualification: जेठमलानींसमोर ठाकरेंच्या शिवसैनिकाचा मराठी बाणा, सुनावणीतील खडाजंगी जशीच्या तशी..

अंकित तांबे आयनी मेटे येथे हळंदी समारंभासाठी निघाला होता. यावेळी अंकित एम.एच.48/बी.झेड/3278 दुचाकीवरून जात असताना त्याला समोरून आलेल्या एम.एच.08/बी.सी/0232 या टेम्पोने धडक दिली. या धडकेत अंकीत तांबे यास डाव्या डोळ्याला तोंडाला छातीला गंभीर स्वरुपाच्या दुखापती होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या रुपेश सावंत याच्या डोक्याला, कपाळाला, तोंडाला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान कुंभाड बैद्धवाडी येथील राजेंद्र जानु तांबे यांनी या अपघात प्रकरणाची फिर्याद खेड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. शुभम संतोष घोरपडे रा. मिर्ले हुंबरवाडी या संशयीत टेम्पो चालकावरती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

    follow whatsapp