Gautam Singhania :भारताचे अब्जाधीश उद्योगपती आणि रेमंड्स टेक्सटाईलचे (Raymond’s Textiles) मालक गौतम सिंघानिया यांनी सोमवारी पूर्वीसारखी आता दिवाळी साजरी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. कारण गेली 32 वर्षे आम्ही एकत्र घालवल्यानंतर गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी (Nawaz Modi) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खुद्द गौतम सिंघानिया यांनीच असं स्पष्टपणे सांगितले. आहे.
ADVERTISEMENT
दोघांचा स्वतंत्र मार्ग
गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावरुन स्पष्ट केले की,लग्नाच्या 32 वर्षानंतर आम्ही दोघांनी एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय आम्ही दोघांच्या संमतीने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘आम्ही दोघांनी स्वेच्छेने स्वतंत्र मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला असून विभक्त होत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
रिलेशनशिपनंतर विवाह
सिंघानिया यांनी 1999 मध्ये भारतीय सॉलिसिटर नादर मोदी यांची मुलगी नवाज मोदी यांच्याबरोबर विवाह केला होता. त्यांनी 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 29 वर्षीय नवाजसोबत 1999 मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते. गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज ही पारशी असून त्यांनी एकत्र अनेक वर्षे घालवल्यानंतर त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा >> पवार कुटुंबीय दिवाळीत एकत्र येणार का? गोविंद बागेत पाडव्याची जय्यत तयारी पण…
पालक म्हणून जबाबदार असणारच
गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियाच्या एक्सवर लिहिले, ‘यंदाची दिवाळी आमच्यासाठी पूर्वीसारखी नाही. कारण 32 वर्षे आम्ही एकमेकांसोबत एकत्र राहिलो आहे. पालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याचबरोबर एकमेकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभाही राहिलो आहे.
दोघींचा सांभाळ आम्हीच करु
सोशल मीडियावरुन ही दोघं विभक्त होत असल्याचे सांगत त्यांनी यावेळी दोन्ही मुलींचाही उल्लेख केला आहे. या क्षणी ‘आम्ही दोघं वेगळे होत असलो तरीही. आपल्या मुली निहारिका आणि निसा सिंघानिया यांची अगदी पहिल्यासारखीच काळजी घेऊ. त्या दोघींसाठी जे जे चांगले असेल तर ते ते आम्ही करु असा शब्दही त्यांनी यावेळी दिला आहे. करू.
माणसांच सहकार्य
विभक्त होण्याच्या चर्चेबरोबरच त्यांनी हे ही सांगितले की, आपल्या कुटुंबाभोवती अनेक अफवा. त्यामुळे विभक्त होण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. कारण कोणतेही वैयक्तिक संबंध सुधारण्यासाठी माणसांच सहकार्य लाभणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
फ्लॅटवरून वाद
गेल्या वर्षी एका फ्लॅटवरून गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांच्यासोबत वादही झाला होता. जी विजयपत सिंघानिया यांना तो विकायचा होता. मात्र गौतम सिंघानिया यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे हा वाद पुढे इतका वाढला की, त्या दोघांचेही त्यामुळे संबंध बिघडले. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड ग्रुपची स्थापना केली होती. कपड्यांमध्ये या रेमंडचे कायमच वर्चस्व राहिले आहे.
ADVERTISEMENT