Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला की, 70 एकरमध्ये पसरलेले राम मंदिर भक्तांसाठी खुलं केलं जाणार आहे. त्यामुळे या भव्यदिव्य कार्यक्रमाची सुरुवात म्हणजेच पूजा करण्याच्या सर्व विधी आजपासून सुरु केल्या जाणार असून त्या विधी 22 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे राम मंदिरामध्ये (Ram Mandir) होणाऱ्या 22 जानेवारी पर्यंत नेमका काय कार्यक्रम होणार आहे आणि कोणत्या दिवशी काय केले जाणार आहे त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
ADVERTISEMENT
विधिवत कार्यक्रमाची रुपरेषा
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये 22 जानेवारी पर्यंत नेमकं काय काय होणार याची उत्सुकता सर्वच जनसामान्य माणसांना लागून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या विधिवत कार्यक्रमाला आजपासून पूजा क्रियाकर्माचा कार्यक्रम होणार आहे.
हे ही वाचा >>Congress : पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये ‘धुसफूस’, केदार म्हणाले, ‘अन्याय झालाय’
असा होणार पुजेचा विधी
*16 जानेवारी रोजी प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजा होणार आहे.
*17 जानेवारीला पुतळा राम मंदिराच्या प्रांगणात दाखल होणार आहे.
*18 जानेवारी रोजी ही मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जलयात्रा, जलाधिवास, गांधव आणि तीर्थपूजाही केली जाणार आहे.
*19 जानेवारी रोजी औषधीवास, केशराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवासाची पूजा होणार आहे.
*20 जानेवारी रोजी शाखाधिवास, फलाधिवास आणि पुष्पाधिवास यांची पूजा होईल.
*21 जानेवारी रोजी मध्याधिवास आणि शय्याधिवास पूजा होणार आहे. त्यानंतर महत्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
*22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता प्राणप्रतिष्ठा सुरू होईल.
शिल्पकार योगीराज
म्हैसूरमधील प्रसिद्ध शिल्पकारांच्या कुटुंबातून आलेले अरुण योगीराज हे देशातील सगळ्यात जास्त मागणी असलेले शिल्पकार आहेत. अरुणचे वडील योगीराज हेसुद्धा कुशल शिल्पकार आहेत. त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजाकडून संरक्षण दिले होते. अरुण योगीराज यांचाही लहानपणापासूनच मूर्तीच्या कोरीव कामाशी संबंध आहे.
अरुण योगीराज नेमकं काय करतात
अरुण हा उच्चशिक्षित आहे, त्याने एमबीएसुद्धा केले आहे, एमबीएनंतर काही काळ त्याने एका खासगी कंपनीत नोकरीही केली होती. मात्र शिल्पकलेच्या त्याच्या कौशल्यामुळे आणि त्याच्या आवडीमुळे त्याला नोकरीमध्ये रस वाटला नाही. त्यामुळे त्याने त्यानंतर 2008 पासून कोरीव काम सुरु केले आहे.
ADVERTISEMENT