तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माची तुलना डेग्यू, मलेरिया सारख्या आजारांशी केली होती. यामुळे सनातन (Sanatan Controversy) वरून मोठा वाद पेटला होता. तसेच भाजपने या विधानाला विरोध करत विरोधकांच्या इंडिया आघाडीला टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न केला होता. यानंतर आता या सनातन वादावर बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सनातनला शिव्या देणार्या सर्वांचा 2024 मध्ये मोक्ष होणार आहे, असे बाबा रामदेव म्हणाले आहेत. (sanatan dharma controversy baba ramdev reaction udhayanidhi stalin controversial statement)
ADVERTISEMENT
बाबा रामदेव शुक्रवारी वाराणसीत होते, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना बाबा रामदेव म्हणाले की, सनातनला शिव्या देणार्या सर्वांचा 2024 मध्ये मोक्ष होणार आहे. काशी ही शाश्वत नगरी आहे. अनादी आणि अनंताची पूजा करण्यासाठी हे एक उत्तम तीर्थक्षेत्र आहे. हे ज्ञान आणि मोक्षाचे शहर आहे. त्यात युगानुयुगे देवत्व होते, पण पंतप्रधान मोदींनी त्यात भव्यता वाढवली. आणि भारतीय सांस्कृतिक वारसा असलेले हे महातीर्थ काशी आपल्या संपूर्ण वैभवाने जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हेल्थ टुरिझम, धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटनासाठी हे जगभरात आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्ञान पर्यटन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक पर्यटन हे सनातन धर्माचे सार आहे.
हे ही वाचा : Rain Update : मुंबईसह महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार, बाप्पाच्या आगमनालाच बरसणार मुसळधार
पैगंबर मोहम्मद मर्यादा पुरुषोत्तम
बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव (Chandrashekhar Yadav) यांनी शुक्रवारी एक वादग्रस्त विधान केले होते. चंद्रशेखर यादव यांनी रामचरितमानसची तुलना घातक पोटॅशियम सायनाइडशी केली होती. पंचावन्न प्रकारचे डिशेस सर्व्ह केल्यानंतर त्यात पोटॅशियम सायनाइड मिसळले तर काय होईल, हिंदू धर्मग्रंथांची अशीच अवस्था आहे. त्यामुळे रामचरितमानसला माझा विरोध आहे आणि आयुष्यभर असेच राहील, असे विधान चंद्रशेखर यादव यांनी केले होते. तसेच जन्माष्टमीला पैगंबर मोहम्मद यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले होते. या त्यांच्या दोन्ही विधानावर वाद पेटला होता.
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाला?
उदयनिधी स्टॅलिन 2 सप्टेंबरला सनातन सम्मेलनाला पोहोचले होते. या सम्मेलनात त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्याच पाहिजेत. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलंच पाहिजे. त्याचप्रमाणे सनातनलाही संपवायचे आहे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.
ADVERTISEMENT