Ajit Pawar in Satara : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी साताऱ्याच्या राजकारणात सतत चर्चेत राहणाऱ्या दोन्ही राजेंना कानपिचक्या लगावल्या. जे काम करतात त्यांना निवडून देण्याबद्दल आत्मचिंतन करा, असा सल्ला देताना अजित पवारांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे यांच्यावर नामोल्लेख न करता निशाणा साधला.
ADVERTISEMENT
राजेंद्र चोरगे यांच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. याच कार्यक्रमात त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून साताऱ्यातील लोकप्रतिनिधींना टोले लगावले.
अजित पवार म्हणाले, “जग कुठे चाललंय, आपण कुठे आहोत? काय चाललंय? मी संगम माहुलीला येताना पाहिलं, इतका कचरा… काय? लोकप्रतिनिधींना दिसत नाही की, कुणाला काही कळत नाही. इतका बकालपणा. मी तर साताराकरांनाच दोष देईन. तुम्ही जे चांगली कामे करू शकतात अशा का निवडून देत नाही. याबद्दल तुम्ही पण आत्मचिंतन करा ना”, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
हेही वाचा >> Eknath Shinde : ‘शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना काढा’, हायकमांडचा CM शिंदेंना आदेश, ‘ते’ मंत्री कोण?
“तुम्ही माझ्या बारामतीत येऊन बघा, मी काय काय करत असतो तिथे. मी इथं बोलत नाही, तर मी माझ्या भागात करतो. मग दुसऱ्यांना सांगतो. तुमच्या हातात आहे की, कुणाला पाठवायचं आणि कुणाला थांबवायचं. लोकांनी चांगल्या लोकांच्या पाठिशी उभं राहावं. चांगली कोण आहेत आणि कोण नाहीत, हे समजण्याइतके तुम्ही हुशार आहात”, असं म्हणत अजित पवारांनी साताऱ्यातील मतदारांना अप्रत्यक्षपणे राजेंद्र चोरगे यांच्या पाठिशी उभं राहण्याचे आवाहन केले.
भाजपमधील नेते संपर्कात
अजित पवार यांनी साताऱ्यात माध्यमांशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांना भाजपमध्ये गेलेले नेते तुमच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “आम्ही काय एकमेकांचे दुश्मन नाही. सत्तेत असताना पक्ष न पाहता सर्वांचे काम करण्याचा प्रयत्न मी केला. लोक कामानिमित्त भेटतात.”
हेही वाचा >> Sakshi Murdered : साक्षीची एक्स बॉयफ्रेंडसोबत ‘बाईक राईड’ अन् साहिलने…
महाराष्ट्रातच काम करणार
सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनीही डोकं वर काढलं. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. बारामतीकरांनी मला 1991 साली निवडून दिलं. मी सहा महिने खासदार म्हणून राहिलो. राष्ट्रीय स्तरावरील चित्र पाहिलं. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे 30 ते 32 वर्षांपूर्वी ठरवलं की महाराष्ट्रातच काम करायचं. तेव्हापासून मी आतापर्यंत महाराष्ट्रात काम करतोय.”
ADVERTISEMENT