Noida News :पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा हैदर (Seema Haider) सचिनच्या (Sachin) प्रेमात पडली तेव्हा ती आकंठ बुडून गेली होती. तिच्या त्या प्रेमामुळेच तिला आकाशही आणि प्रादेशिकतेच्या सीमा तोकड्या पडल्या होत्या. त्या प्रेमामुळे नंतर ती पाकिस्तान सोडून ग्रेटर नोएडातील रघुपूर येथे राहायला आली. सीमा हैदर जेव्हा पाकिस्तानातून (Pakistan to Noida) नोएडाला राहायला आली, त्यानंतर तिने आणि सचिनने लग्न केले आणि त्यानंतर ती दोघं एकत्र राहू लागली.
ADVERTISEMENT
सीमा बनणार आई
सीमा हैदर ही भारतात आल्यापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता नवीन गेल्या वर्षी भारतात आलेल्या सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.आता नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच सीमा हैदरने एक मोठी खुशखबरही दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे.
हे ही वाचा >> New Hit And Run Law: ट्रक चालकांनी पोलिसांना पळवून-पळवून मारलं, नवी मुंबईत हायवेवर तुफान राडा
हे वर्षं तिच्यासाठी खास
सीमा हैदर जेव्हा पाकिस्तानातून भारतात आली तेव्हापासून ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते वेगळ्याच कारणामुळे. कारण सीमा हैदर आता लवकरच आई होणार आहे. सीमा हैदर सांगते की, 2023 हे वर्षं हे तिच्यासाठी अगदी खास होते, तर 2024 हे वर्ष मात्र तिच्यासाठी आनंदाचे अनेक क्षण घेऊन आले आहे.
कुटुंब आनंदात
ती आई होणार असल्याचे सांगितले जात असले तरी ती होळीच्या सणापर्यंत ती बाळाला जन्म देईल असंही सांगितलं जात आहे. होळी सणामध्येच त्यांच्या बोबड्या बोलणं गजबजून जाणार आहे. तिच्या या आनंदामुळेच तिच्यासह सगळं कुटुंब आता आनंदात आहे.
भारतीयत्वासाठी कसून नाही
सीमा हैदर जेव्हा सचिनच्या प्रेमात पडली तेव्हा ती नेपाळमार्गे भारतात आली होती. त्यावेळी ती आपल्या चार मुलांना सोबत घेऊन आली होती. तिचा मोठा मुलगा हा 8 वर्षाचा असून बाकीच्या तीन तिला तीन मुली आहेत. ती सध्या आई होणार असली तरीही अजून तिला पोलिसांकडून क्लिनचिट मिळाली नाही. सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून वकील ए. पी. सिंग खटला लढवत आहेत. भारताचे नागरिकत्वासाठी ती सीमाकडूनही कोणतीही कसर सोडली जात नाही.
ADVERTISEMENT