‘मला माफ करा, माझा अंदाज..’, भुजबळांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी शरद पवारांचा नामी डाव!

मुंबई तक

08 Jul 2023 (अपडेटेड: 08 Jul 2023, 04:05 PM)

येवल्यातील सभेत आपण अनेक वर्ष चुकीचा उमेदवार दिला असं म्हणत शरद पवार यांनी येथील मतदारसंघातील मतदारांची माफी मागितली आहे. पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले.

Sharad Pawar has apologized to the voters of the constituency saying that he had given the wrong candidate for many years in the meeting in Yeola

Sharad Pawar has apologized to the voters of the constituency saying that he had given the wrong candidate for many years in the meeting in Yeola

follow google news

Maharashtra political news in marathi: येवला: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी फूट पडली आहे. यावेळी अजित पवारांसोबत शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत जुने सहकारी असलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील या बंडात सहभागी झाले. एवढंच नव्हे तर त्यांनी मंत्रिपदाची देखील शपथ घेतली. ज्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाही चढवला. यानंतर ही सगळी पडझड रोखण्यासाठी शरद पवारांनी आजपासून (8 जुलै) महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली आहे. ज्याची पहिली सभा शरद पवारांनी छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यातच (Yeola) घेतली. (Sharad Pawar apologized voters constituency yeola wrong candidate ncp chhagan bhujbal ajit pawar maharashtra politics news latest)

हे वाचलं का?

आपल्या या सभेत शरद पवारांनी छगन भुजबळांवर अजिबात वैयक्तिक टीका केली नाही. याउलट त्यांनी या मतदारसंघातून भुजबळांना निवडून देणाऱ्या मतदारांची चक्क माफी मागितली आहे. त्यांच्या या पवित्र्याने सगळेच जण चक्रावून गेले आहेत. कारण आपली निवड चुकली व त्याच्या यातना तुम्हा लोकांना भोगाव्या लागल्या असं म्हणत पवारांनी येवल्यातील मतदारांची माफी मागितली.

‘मी माफी मागतो, माझा अंदाज चुकला..’, शरद पवारांनी घातला मतदारांच्या काळजाला हात

येवल्याच्या सभेत भाषण करताना शरद पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्रात गेली अनेक ज्या जिल्ह्याने पुरोगामी विचाराला साथ दिली त्या जिल्ह्याचा उल्लेख करायचा असेल तर त्या जिल्ह्याचं नाव नाशिक आहे.. या नाशिक मधील कष्टकरी शेतकरी असेल, वरच्या भागातील आदिवासी असेल, दुष्काळी भागातील आमचा सहकारी असेल. यांच्यावर संकटं आली पण त्यांनी आमची साथ कधी सोडली नाही. त्यामुळे असा विचार केला की, मुंबईमध्ये काही लोकांना आम्ही जनतेच्या समोर सादर केल्यानंतर यश मिळवता आलं नाही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आणायचं असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही येवल्याची निवड केली.’

‘मघाशी काही वक्त्यांनी सांगितलं की, पवार साहेबांनी नाव दिलं. त्यांना आम्ही निवडून द्यायचो. एकदा, दोनदा.. तीनदा निवडून द्यायचो. नाव कधी चुकलं नाही.. पण एका नावात घोटाळा झाला. त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला.. त्यासाठी आज मी इथे का आलोय.. आज मी इथे आलोय.. कोणाचं कौतुक करण्यासाठी नाही. कोणावर टीका करण्यासाठी नाही.’

हे ही वाचा >> ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी आम्हाला…’, मुनगंटीवारांची शरद पवारांवर बोचरी टीका

‘आज मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलोय.. मी माफी यासाठी मागतो की, माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज चुकला.. माझा अंदाज चुकला माझ्या विचारावर तुम्ही निर्णय घेतला. त्यामुळे तुम्हालाही यातना झाल्या. तुम्हाला यातना या माझ्या निर्णयामुळे झाल्या असतील तर माझं कर्तव्य आहे की, तुम्हा सगळ्यांची माफी मागावी.’

‘माफी मागत असताना दुसरी गोष्ट की, कधीकाळी लोकांच्या समोर जायची वेळ येईल.. आज येईल, उद्या येईल, परवा येईल.. महिन्याने येईल नाही तर वर्षाने येईल. त्यावेळेस पुन्हा येथे येईल. पुन्हा इथे येऊन.. चूक करणार नाही.. योग्य निकाल सांगेन.. तेव्हाही या मतदारसंघात जनतेची साथ मिळाल्याशिवाय राहणार नाही.’

‘राजकारण करायचं कशासाठी?, राजकारण करायचं यासाठी की, सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करायची. ही भूमिका घेऊन राजकारण करण्यासंबंधीचा विचार आम्हा सर्वा लोकांनी केला. इथं जरी दुष्काळ असेल, संकटं असतील तरी इथली लोकं कधी स्वाभिमान सोडणार नाहीत.’

‘या स्वाभिमानी लोकांना खऱ्या अर्थाने पुन्हा शक्ती द्यायची गरज आहे. त्यासाठी आम्हा लोकांना अधिक जबाबदारी द्यावी लागेल.’ असं म्हणत शरद पवार यांनी येथील मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवारांचा नामी डाव…

खरं तर शरद पवार हे आजवर भावनेचं राजकारण करत नाही असं आपल्याला पाहायला मिळालं आहे. मात्र, मतदारांच्या भावनांना हात घालून त्यांना कसं चुचकरायचं हे शरद पवारांना अतिशय योग्यरित्या माहीत आहे. ज्याचा प्रत्यत त्यांनी दुसऱ्यांदा आणून दिला आहे.

अशाप्रकारचा एक डाव त्यांनी 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या शेवटच्या प्रचार सभेत टाकला होता. पवारांची ही प्रचार सभा खरं तर त्यांच्या पावसात भिजलेल्या भाषणामुळे झाली होती. पण यावेळी देखील त्यांनी साताऱ्यातील मतदारांची माफी मागितली होती. गेली काही वर्ष येथे उमेदवार देताना आपली चूक झाली असं शरद पवार येथे म्हणाले होते.

हे ही वाचा >> Exclusive: ‘अजितला तीनदा उपमुख्यमंत्री केलं, पण सुप्रियाला…’, शरद पवार अखेर मनातलं बोललेच!

पवारांच्या याच भाषणाच एवढा अचूक परिणाम झाला होता की, मोदी लाटेत दोनदा निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांचा चक्क लाखभराच्या मतांनी पराभव झाला होता.

आता अशाच प्रकारचा डाव शरद पवारांनी छगन भुजबळांविरोधातही टाकला आहे. त्यामुळे त्यांचा हा डाव यशस्वी होती की नाही हे आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीतच समजू शकेल.

    follow whatsapp