Ajit Pawar Video : ‘लैच जहरी शब्द’, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलं ट्रोल

NCP News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या भाषणातील या विधानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

NCP's Sharad pawar Faction trolled ajit pawar

NCP's Sharad pawar Faction trolled ajit pawar

भागवत हिरेकर

• 06:07 AM • 19 Jan 2024

follow google news

Ajit Pawar NCP : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीचा मुंबईत मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘मी शब्दाचा पक्का आहे. तशीच माझी महाराष्ट्रात ओळख आहे.’ अजित पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लक्ष्य केले. राष्ट्रवादीने अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यापूर्वी केलेल्या विधानांची आठवण करून देत ट्रोल केलं.

हे वाचलं का?

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणालेले की, “मी पहिल्यापासून शब्दांचा एकदम पक्का म्हणून माझी ओळख महाराष्ट्रात आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं, कुणाला खेळवत ठेवणं, हे मला अजिबात जमत नाही.’

राष्ट्रवादीने दाखवले जुने व्हिडीओ

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या भाषणातील या विधानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नाही, तर अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यापूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली आहे.

हेही वाचा >> संजय राऊतांना घेरण्याची तयारी! सोमय्यांनी दाखवले आकडे

मकर संक्रातीच्या शुभेच्छा देताना अजित पवारांनी मोदींना हटवा, असं आवाहन सभेला उपस्थित असलेल्या लोकांना केलं होतं. इतकंच नाही, त्याचबरोबर मला राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचं नाहीये, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करतानाचा व्हिडीओ दाखवला आहे.

हेही वाचा >> भाजपची ऑफर की काँग्रेसविरोधात रणनीती! शिंदेंच्या गौप्यस्फोटाचा अर्थ काय?

मूग गिळून गप्प झालेत -राष्ट्रवादी

हा व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, “दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात”, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

    follow whatsapp