Sharad Pawar ajit pawar ncp : अजित पवार परत आले, तर परत घेणार का? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं. त्याचबरोबर अजित पवार आमचे नेते नाहीत, अशी भूमिका त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर मांडली.
ADVERTISEMENT
सातारा येथे माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी अजित पवारांना पक्षात परत घेण्याबद्दल हे विधान केले.
शरद पवार काय म्हणाले?
अजित पवार परत आले, तर?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, “प्रश्न असा आहे की, एकदा दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असेल आणि त्यानंतर ती दुरुस्त केली असेल, तर एक संधी द्यावी. त्यांना पक्षात वापस घेतलं.”
वाचा >> Sharad Pawar : ‘थोडी अक्कल तर वापरा’, ‘तो’ प्रश्न ऐकताच पवारांचा चढला पारा
“तुम्हाला आठवत असेल, पहाटेचा शपथविधीला त्यामध्ये आमचे एक सहकारी त्यामध्ये सहभागी होते. त्यामुळे आधी निर्णय घेतला होता आणि त्याच्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही. आमच्याकडून योग्य काम झालं नाही. पुन्हा अशा रस्त्याने जायचं नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी निर्णय घेतलेला होता. पण, संधी ही फार मागायची नसते आणि संधी सारखी द्यायची नसते. मागितली तरी द्यायची नसते”, असे सांगत शरद पवारांनी अजित पवारांना आता परत घेणार नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे अश्रू थांबले नाहीत, त्यामुळे आज…”
‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही’
शरद पवार पक्षातील फुटीबद्दल असं म्हणाले की, “फूट पडणं याचा अर्थ काय… पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा गट वेगळा झाला देशपातळीवर.. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. तर लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला म्हणून फूट पडण्याचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे.”
ADVERTISEMENT