Mla Disqualification Case Prakash Ambedkar : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. कुणाच्या बाजूने निकाल लागणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जुन्या प्रकरणाचा दाखला देत राहुल नार्वेकरांना सुर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी नार्वेकरांनी निर्णय देणार नाही, काय करायचं ते करा, असे आव्हान सुप्रीम कोर्टाला दिलं पाहिजे, असा सल्ला दिला.
प्रकाश आंबेडकर काय बोलले?
आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, “मी असं म्हणेन की, राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की मी नाही देत निर्णय काय करायचं, ते करा. ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत नाहीत. तेव्हा त्यांनी सरळ म्हणावं की, मी निर्णय देत नाही, काय करायचं ते करा. कायद्याचं राज्य चाललं पाहिजे, हे बरोबर आहे. राहुल नार्वेकर निर्णय देत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे, हेही मी मान्य करतो. पण, राहुल नार्वेकर अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत नाहीत. तेव्हा सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना स्वतःच्या ताब्यात घ्यायला बघतंय… यानिमित्ताने विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी सांगितलं पाहिजे की, मी देणार नाही. मला जेव्हा निर्णय द्यायचा आहे, तेव्हा देईन.”
हेही वाचा >> “सत्ता बळकावण्याचे…”, दोषींना सोडणाऱ्या गुजरात सरकारला सुप्रीम कोर्टाने झापले
याच मुद्द्यावर बोलताना आंबेडकर पुढे म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांवर दबाब नाही. विधानसभा अध्यक्षांना एक सामान्य माणूस करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा जो मार्ग आहे. तो संवैधानिक नाही, असं मी मानतो. विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येऊ शकत नाही.”
हेही वाचा >> Ram Mandir सोहळ्याचं CM शिंदेंना आमंत्रण, पण ठाकरेंना नाही; हे आहे कारण
“मी दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाला आठवण करून देईल की, सोमनाथ चॅटर्जी हे ज्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनी उलटा जबाब दिला होता की, नोटीस पाठवणाऱ्याला समन्स बजावतोय आणि तो लोकसभेत येत कसा नाही, ते मी बघतो. तेव्हा कुठे जाऊन भांडण थोडं टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की आमची चूक झाली आहे. लोकसभा अध्यक्षांना आम्ही नोटीस पाठवू शकत नाही. नार्वेकर हे राज्याचे विधानसभा अध्यक्ष आहेत. सोमनाथ चॅटर्जी हे लोकसभेचे अध्यक्ष होते, पण दोघांचा अधिकार समान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी फक्त राहुल नार्वेकरांना म्हणणार आहे की, तुम्हाला सोमनाथ चॅटर्जी होण्याची संधी मिळालेली आहे, ते होऊनच जा”, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला.
ADVERTISEMENT