Crime : सौरभच्या हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर! मुस्कानचा बॉयफ्रेंड साहिलच्या रुममध्ये सापडला 'तो' सांगाडा...

Meerut Saurabh Murder Case : मेरठच्या सौरभ राजपूतच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या रुममध्ये धक्कादायक पुरावे सापडले आहेत.

Saurabh Rajput Murder Case Update

Saurabh Rajput Murder Case Update

मुंबई तक

23 Mar 2025 (अपडेटेड: 23 Mar 2025, 03:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सौरभ राजपूतच्या हत्याप्रकरणात मोठे पुरावे पोलिसांच्या हाती

point

आरोपी साहिल शुक्लाच्या रुममध्ये सापडल्या पेन्टिंग

point

पेन्टिंगचे फोटो पाहून अनेकांना बसला धक्का

Meerut Saurabh Murder Case : मेरठच्या सौरभ राजपूतच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या रुममध्ये धक्कादायक पुरावे सापडले आहेत. आरोपी साहिलने त्याची प्रेयसी मुस्कानचा पती सौरभची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं आणि दोन्ही हात बॅगेत भरून घरी आणले होते. साहिलच्या रुममधून एक फोटो मिळाला. हा फोटो साहिलचा असून खुद्द साहिलच त्या फोटोची पेंटिग करत होता. पण या पेन्टिंगमध्ये नेमकं दडलंय तरी काय? जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

साहिलने रुमच्या भिंतीवर भयानक पेन्टिंग बनवली होती. गुगल लेन्सच्या माध्यमातून या पेन्टिंगची माहिती गोळा करण्यात आली. तेव्हा हि पेन्टिंग भयानक असल्याचं समोर आलं. यामध्ये 666 नंबर आणि राक्षसी प्रवृत्ती असलेलं चित्र रेखाटण्यात आलं होतं. म्हणजेच संख्या 6 ला प्रेम, करुणा, संतुलन आणि सौहार्दचं प्रतिक मानलं जातं. परंतु, 666 हा नंबर एका धर्मात नकारात्मक अर्थ दर्शवतो. याला राक्षसाची संख्या असं म्हटलं जातं. ही संख्या बायबलच्या (Book Of Revelation) शी जोडली जाते, असं म्हटलं जातं. 

हे ही वाचा >> BT MindRush 2025: कुमार मंगलम बिर्ला यांना 'बिझनेस आयकॉन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

त्या फोटोंमुळे सर्वांच्याच उंचावल्या भुवया

"∂" चिन्ह गणितात एक चल म्हणजेच अनित्य संख्या (Variable) चं संबंध दर्शवते. तसच याचं अवलोकन (partial derivative) मध्येही होतं. हे सर्व प्रतिक एकत्रित असणे म्हणजे चांगल्या-वाईट गोष्टींना प्रेरित करण्यासारखं असतं, असं म्हणतात. 

साहिलने भिंतीवर एक पेन्टिंग बनवली होती. या पेन्टिंगमध्ये दोन हात दिसत आहे. एका हातात सिगारेट आहे. या पेन्टिंगच्या माध्यमातून साहिलला दाखवायचं होतं की, तो सिगारेटमध्ये ड्रग्जचं सेवन कशाप्रकारे करायचा. या पेन्टिंगवर साहिलने लिहिलं होतं,'Puff Puff Pass'

हे ही वाचा >> मोठी बातमी... सुशांत सिंहची हत्या झाली नाही, CBI ने दाखल केला क्लोजर रिपोर्ट

शिवभक्त होता साहिल

साहिलने रुमच्या भिंतीवर सर्व ठिकाणी भगवान शंकराची पेन्टिंग केली होती. हर हर महादेव, बूम शंकर आणि आदियोगी असं त्याने भिंतीवर लिहिलं होतं. 

अॅशट्रेवर सांगाडा

साहिलच्या रुममधून एक अॅश ट्रे मिळाला. त्या अॅशट्रेवर सांगाडा असल्याचं दिसत आहे. या अॅश ट्रे मध्ये सिगारेटचे अनेक तुकडे मिळाले.

 

    follow whatsapp