Bhalgaon villegers angree on Bjp MP Sujay Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालूक्यातील भालगाव येथे भाजप खासदार डॉ, सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि आमदार मोनिका काजळे (Monika Kajle) यांना एका कार्यक्रमात लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या कार्यक्रमात सुजय विखे पाटील डाळ-साखर वाटप करण्यास आले होते. मात्र ‘आम्हाला तुमची डाळ-साखरेची भेट नको, आमच्या गावाला पाणी द्या’ असे संतापून नागरीक बोलताना दिसले. यानंतर सुजय विखेंनी त्याच्या पाणी योजनेची माहिती दिली. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. (sujay vikhe patil bjp mp pathardi bhalgaon villegers angree video viral mla monika kambale ahmadnagar news)
ADVERTISEMENT
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त खासदार सुजय विखे यांच्याकडून प्रत्येक गावात डाळ साखर वाटप करण्यात येत आहे. हाच कार्यक्रम आज पाथर्डी तालुक्यातील भालगावात होता. यावेळी या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांना स्थानिक गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सुजय विखे पाटील बोलत असताना, ‘पाच वर्षात खासदार म्हणून तुम्ही काय केलेत?’ असा ऐकाने सवाल केला. यावर विखे म्हणाले, ‘सांगतो तो ना, ऐका ना…’यावर ग्रामस्थ म्हणाले, ‘काय सांगता तुम्ही? तुमच्या योजना येऊ द्या मग बोला’,
तसेच ‘पाणी दिले तर गावात येऊ असा तुमचा शब्द होता’,अशी आठवण देखील ग्रामस्थांनी सुजय विखेंना करून दिली. त्यामुळे या कार्यक्रमात सुजय विखेंना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
हे ही वाचा : BMC: शिंदे-भाजपच्या आमदारांना कोट्यवधी.. ‘मविआ’च्या आमदारांचे हात रिकामेच’!
दरम्यान ग्रामस्थांचा रोष शांत झाल्यानंतर सुजय विखे यांनी पाणी पुरवठा योजनेची माहिती दिली. यावेळी सुजय विखे म्हणाले की, पाणी पुरवठा योजनेची सुरूवात आपल्या आमदार ताई आणि आमच्या माध्यमातून होत आहे. ज्याला कुणाला शंका असेल त्याने माझ्याबरोबर चला, मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम मंजूर केले जात नव्हतं. आपलं सरकार आलं काम मंजूर झालं. इथे अध्यक्ष उभे आहेत, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही आमच्या परिवाराला किती वर्षापासून ओळखता, विखे पाटील परिवार तुमच्यासाठी नवीन आहे का? असे म्हणत त्यांनी विखे पाटलांनी गँरंटी देऊन योजनात लवकरात अंमलात आणण्यात येईल, असे आश्वासन दिले.
ADVERTISEMENT