छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींनी केलेल्या विधानांमुळे भाजपची कोंडी झाली असून, विरोधकांनीही भाजपला खिंडीत पकडल्याचं राज्यात दिसत आहे. त्यात या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेवरही विरोधकांकडून टीका होत आहे. सुप्रिया सुळेंनीही यावरून फडणवीसांना लक्ष्य केलंय.
ADVERTISEMENT
पुण्यातल्या नवले ब्रिजवर रविवारी अपघात झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर मांडलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टोला लगावला.
राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही केलं तर चूक असतं आणि त्यांनी केलं तर मनात तसं नसतं. त्याच्यामुळे डबल स्टॅण्डर्स त्याचे आहेत. देवेंद्रजी काय करतील. त्यांना शेवटी बिचाऱ्यांना डिफेंड करायला लागतं असेल. दिल्लीवरून कुणाचा फोन आला असेल, मला माहिती नाही. पण हे दुर्दैव आहे”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीये.
‘…मग आम्हीही राहुल गांधींच्या बाबतीत हे बोलू शकतो’, फडणवीसांवर संजय राऊतांचा प्रहार
“देवेंद्रजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. माझी देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होती. या राज्याचे ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. कुठल्याही विचाराचे आपण असाल, पण छत्रपतींचा अपमान होणं, त्याची पाठराखण तु्म्ही करत असाल, तर हे दुर्दैवी आहे”, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
‘अशा लोकांना पक्षाने कापून फेकून दिलं पाहिजे’; उदयनराजे भोसलेंच्या संतापाचा कडेलोट
भाजपला छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार आता नाही -सुप्रिया सुळे
“भारतीय जनता पक्षाला छत्रपतींचं नाव घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण जेव्हा जेव्हा छत्रपतींचा अपमान होतो, त्यांच्याच कुठल्यातरी सहकार्यांकडून होतो आणि त्याची पाठराखण भाजपकडून केली जाते. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना छत्रपतींचं आणि फुले-शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा कुठलाही अधिकार आता नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ADVERTISEMENT