–वसंत मोरे, बारामती
ADVERTISEMENT
Supriya Sule post on Sharad Pawar birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केलं जात आहे. पवारांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. ‘प्रिय बाबा, लढेंगे-जितेंगे’, म्हणत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांनी लिहिलेली पोस्ट
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
हेही वाचा >> ‘त्या’ ट्विटमुळे राहुल शेवाळे अडचणीत; ठाकरेंच्या वकिलांनी घेरलं
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
हेही वाचा >> “मविआ सोडणार, भाजपसोबत सरकार… उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं होतं वचन”
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !!
बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ADVERTISEMENT