Narendra Modi: भारताची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे 2023 मध्येही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी वर्षांसाठी 5 ट्रिलियन (5 trillion) रुपयांच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य (goal of the economy) ठेवले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व गोष्टींचे तपशील स्पष्ट केले आहेत.
ADVERTISEMENT
इंडिया टुडेचे मुख्य संपादक आणि चेअरपर्सन अरुण पुरी, उपाध्यक्ष काली पुरी आणि ग्रुप एडिटोरियल डायरेक्टर राज चेंगप्पा यांच्याबरोबर झालेल्या मुलाखती वेळी त्यांनी ही माहिती सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जेव्हा मी 2001 मध्ये गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा त्याच्या अर्थव्यवस्था ही सुमारे 26 अब्ज डॉलर (2.17 लाख कोटी रुपये) एवढी होती.
हे ही वाचा>> PM मोदींचं देशाला New Year चं मोठं गिफ्ट… काय ते तुम्हीच पाहा!
धोरणांचा-सुधारणांचा परिणाम
मात्र जेव्हा मी पंतप्रधान पदासाठी गुजरात सोडले तेव्हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा आकार 133.5 अब्ज डॉलर्स (11.1 लाख कोटी रुपये) इतका झाला होता. त्यावेळी केलेल्या अनेक धोरणांचा आणि सुधारणांचा परिणाम म्हणजेच आज गुजरातची अर्थव्यवस्था ही सुमारे 260 अब्ज डॉलर्स (21.6 लाख कोटी रुपये) इतकी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्रॅक रेकॉर्ड
या मुलाखतीत त्यांनी हेही स्पष्ट केले की, 2014 मध्ये मी पंतप्रधान झालो तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 20 ट्रिलियन डॉलर्स (167 लाख कोटी रुपये) होती आणि 2023-24 च्या अखेरीस भारताचा जीडीपी 37.5 ट्रिलियन डॉलर्स (312 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त असणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. त्यामुळे हा 23 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्डच तुम्हाला तुमचे वास्तव समोर दाखवते असंही त्यांनी स्पष्ट केले.
पुरवठा साखळी उद्ध्वस्त
विरोधकांच्या महागाईसंदर्भात केलेल्या आरोपाबाबत केलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 2 वर्षांच्या शतकातील महामारी आणि जागतिक संघर्षामुळे ही ही जागतिक पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली आहे. जगभरात मंदीचा दबाव निर्माण झाला असला तरीही भारताने लवचिकता दाखवली आहे.
जागतिक परिणाम
यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले की, अनेक मोठ्या अडचणी, जागतिक संकटं, पुरवठा साखळीतील बिघाड आणि भू-राजकीय ताण तणावामुळेही जगभरातील किमतींवर त्याचा परिणाम झाला आहे. यावेळी त्यांनी हे ही स्पष्ट केले की, 2014-15 ते 2023-24 (नोव्हेंबरपर्यंत) सरासरी चलनवाढ केवळ 5.1 टक्के होती, तर मागील 10 वर्षांमध्ये (2004-14) ती 8.2 टक्के होती.
ADVERTISEMENT