Ratan Tata Passed Away: भारताने गमावला दिलदार उद्योगपती, रतन टाटांचं निधन

मुंबई तक

10 Oct 2024 (अपडेटेड: 10 Oct 2024, 01:39 PM)

Ratan Tata Death News: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

उद्योजक रतन टाटांचं निधन

उद्योजक रतन टाटांचं निधन

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्योजक आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचं निधन

point

वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटांनी घेतला अखेरचा श्वास

point

रतन टाटा यांच्यावर मागील काही दिवसांपासून सुरू होते उपचार

Breaking News: मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज (9 ऑक्टोबर) निधन (Ratan Tata Passed Away) झाले. ते 86 वर्षांचे होते. टाटा सन्स या देशातील सर्वात मोठे व्यावसायिक ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वार्धक्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या.  उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

रतन टाटांचं निधन नेमकं कशामुळे?

  • रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार करण्यात आले
  • ब्रीच कॅन्डी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील,चौथा मजला हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव होता
  • उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर रतन टाटा यांना, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने खूप उंची गाठली. रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 2012 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी 1996 मध्ये टाटा सर्व्हिसेस आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांची स्थापना केली.

    follow whatsapp