Mumbai Spirit Video Viral : आयसीसी टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंची आज मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत क्रिकेट प्रेमींनी तुफान गर्दी केली होती. या तुफान गर्दीतून मुंबईकरांनी रूग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली आहे. मुंबईकरांनी त्यांच्या या कृतीतून समाजभान जपलं आहे आणि मुंबईच स्पिरिट दाखवलं आहे. या संदर्भातला व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
खरं तर आज वर्ल्ड चॅंम्पियन खेळाडूची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीतून एखाद वाहन ही जाईल की नाही अशी शक्यता कमीच होतीच.
मात्र खेळाडूंच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या मुंबईकरांनी रुग्णवाहिका येताच तिला वाट मोकळी करून दिली. इतक्या अलोट गर्दीतही मुंबईकरांनी ज्या प्रकारे समाजभान जपलं आहे, त्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. या संदर्भातला व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana App: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा!
दरम्यान भारतीय क्रिकेट संघ अखेर चार दिवसांनंतर बार्बाडोस या कॅरेबियन बेटावरून 4 जुलै रोजी मायदेशी परतला. देशाची राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर खेळाडूंनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी स्पेशल ‘चॅम्पियन’ जर्सी घातलेल्या खेळाडूंबरोबर फोटोही क्लिक केले.
टीम इंडियाने 17 वर्षांनी टी20 वर्ल्डकप आणि 11 वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं आहे. इतकी वर्षे क्रीडारसिक या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वात हे स्वप्न पूर्ण झालं आहे. भारताने दुसऱ्यांचा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे.
ADVERTISEMENT