Thunderstorm in Mumbai: पहाटे 4 वाजता अचानक उडाली लोकांची झोप; मुंबईतील सर्वात थरारक Video 'तुफान' व्हायरल

मुंबई तक

24 Sep 2024 (अपडेटेड: 24 Sep 2024, 01:32 PM)

Mumbai Thunderstorm lightning Video Viral : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. पण मुंबईत वादळ आणि विजेचा कडकडाट पाहून लोकांचा खरकाप उडाला आहे.

Mumbai, thunderstorm lightning and strong wind in mumbai, Mumbai Thunderstorm Video Viral

Mumbai, thunderstorm lightning and strong wind in mumbai, Mumbai Thunderstorm Video Viral

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबतील सर्वात धक्कादायक व्हिडीओत होतोय व्हायरल

point

मुंबईत आज पहाटे 4 वाजता लोकांमध्ये भीतीचं वातावरण

point

मुंबईचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

Mumbai Thunderstorm lightning Video Viral : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. पण मुंबईत वादळ आणि विजेचा कडकडाट पाहून लोकांचा खरकाप उडाला आहे. रिमझीम बरसणाऱ्या पावसाने गुलाबी थंडीसारखं वातावरण निर्माण केलं आहे. आज मंगळावारी पहाटे 4 वाजताच्या सुमारात मुंबईत मोठी घटना घडली. थंडीची हुडहुडी भरलेल्या लोकांची पहाटे चार वाजता झोप उडाली. कारण मुंबईच्या माथ्यावर असलेल्या आकाशगंगेत विजेचा थरार सुरु होता. भल्या पहाटे विजांचा कडकडाट पाहून मुंबईतील नागरिक भयभीत झाले.

हे वाचलं का?

काही लोकांनी विजेचा थरारक व्हिडीओ कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला.मुंबईतील शेकडो नागरिकांनी एक्सवर लॉग इन करून हा भयानक व्हिडीओ पोस्ट केला. मुंबई नगरीत मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट कसा सुरु झाला, हे तुम्ही एक्सवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता. 

मुंबईतील वादळाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील वातावरणात मोठे बदल झाले. दक्षिण मुंबईला मुसळधार पावसासह वादळाचा तडाखा बसला. तसच मुंबईतील इतर ठिकाणीही खराब हवामानाचा फटका बसला.मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटांसह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यात या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पाऊस हजेरी लावू शकतो. विदर्भ, मराठवाड्यात दमदार पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

 

    follow whatsapp