Gold-Silver Price Today : देशात रोज सोन्या चांदीच्या दराची जोरदार चर्चा होत असते. सोन्याचा दर वाढला किती आणि कमी किती झाला याची विचारपूस कायमच केली जाते. सध्या गणेश चतुर्थीमुळे अनेक जण सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असतील तर ही बातमी नक्की वाचा. आज 21 सप्टेंबर रोजी भारतीय सराफ बाजारात (Indian bullion market) सोने आणि चांदी स्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60 हजार रुपयांच्या खाली आला आहे. तर चांदीचा भाव 72 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.तर राष्ट्रीय पातळीवर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59, 255 रुपये तर शुद्ध चांदीची किंमत (Silver Pric) 72,109 रुपये झाली आहे. (today gold silver rates today ibjarates com Silver prices have also fallen)
ADVERTISEMENT
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 59,317 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर आज तोच दर सकाळी 59,255 रुपयांवर आला आहे.
हे ही वाचा >> साईनगरी हादरली! शिर्डीत जावयाने सासरच्या तिघांना संपवलं, पहिला वार पत्नीवर
आज भाव किती आहे?
सोने चांदीचे दर ज्यावर सांगितले जातात त्या ibjarates.com या वेबसाइटनुसार आजचे दर दहा ग्रॅम सोन्याची किंमत 59, 018 रुपयांपर्यंत घसरली आहे. तर त्याचवेळी 22 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 54, 278 रुपये झाली आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा भाव 44, 441 रुपयांवर आला आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा दर आज 34, 664 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत आज 72,109 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >>‘3 idiots’ मधील लायब्रेरियन दुबे काळाच्या पडद्याआड! मृत्यूचे कारण आले समोर
सोन्याचे दर मेकिंग चार्जेनुसार
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीनुसार माहिती देतात. या सर्व किंमती कर आणि मेकिंग चार्जेसनुसार सांगण्यात आल्या आहेत. आयबीजेएने जाहीर केलेल्या दरानुसारच बाजारपेठेत सोने उपलब्ध आहे. मात्र त्यामध्ये सध्या जीएसटीचा समावेश नाही.
ADVERTISEMENT