Mumbai Rains: मुंबईत धो धो बरसला! कुठे कुठे दैना झाली? पाहा सर्व Video एका क्लिकवर

मुंबई तक

26 Sep 2024 (अपडेटेड: 26 Sep 2024, 10:15 AM)

Mumbai Rains Viral Video : मुंबईत धो धो बरसला! मजबुरीचा फायदा घेत रिक्षावाल्यांनी प्रवाशांना लुटलं, Video होतोय व्हायरल गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिमझीम सुरु होती. पण काल बुधवारी रात्री पावसाने संपूर्ण मुंबईला झोडपलं.

IMD Alert In Mumbai

Mumbai Rain Todays Update

follow google news

Mumbai Rains Viral Video : मुंबईत धो धो बरसला! मजबुरीचा फायदा घेत रिक्षावाल्यांनी प्रवाशांना लुटलं, Video होतोय व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिमझीम सुरु होती. पण काल बुधवारी रात्री पावसाने संपूर्ण मुंबईला झोडपलं. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने मुंबईची रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरापालिकेने मुंबई आणि उपनगरात रेड अलर्ट जारी केला असून शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलीय. (Mumbai Heavy Rainfall! For the past few days, it started raining in Mumbai and suburbs. It rained heavily on Wednesday night throughout Mumbai)

हे वाचलं का?

पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेगाड्यांची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी रिक्षाने जायचा पर्याय अवलंबला. परंतु, मजबुरीचा फायदा घेत रिक्षा चालकांनी प्रवाशांची लुटमार केल्याचा दावा नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केला आहे. एक किमीच्या प्रवासासाठी रिक्षाचालकांनी 300 रुपये भाडे घेतल्याचं प्रवासी सांगतायत. प्रवाशांना नाहक त्रास झाल्याचे व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. 

एका नेटकऱ्याने त्याच्या नातेवाईकाचा रिक्षात प्रवास केल्याचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. रिक्षाचालकाने एक किमीच्या प्रवासासाठी ३०० रुपये घेतल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ३ महिने दांडी मारून दोन दिवसाच सिलॅबस संपवा, असा मुंबईचा पाऊस आहे. मध्य मुंबईतील एका प्रवाशाने पाणी साचल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. स्टेशनपासून घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा चालकाला ३०० रुपये द्यावे लागले.

मुंबईच्या अंधेरीतही पावसाचा धुमाकूळ, पाहा Video

घाटकोपर मेट्रो स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी, व्हिडीओ झाला व्हायरल

 

    follow whatsapp