Maharashtra Weather : मराठवाड्यासह विदर्भात होणार विजांचा कडकडाट! 'या' ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी

Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णता प्रचंड वाढली असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Today (Photo - AI)

Maharashtra Weather Today (Photo - AI)

मुंबई तक

• 07:00 AM • 23 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

राज्यातील आजच्या हवामानाच्या स्थितीबाबत जाणून घ्या

Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णता प्रचंड वाढली असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय. काल शुक्रवारी 22 रोजी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 40-50 किमी वेगाने विजांचा कडकडाट, वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती.

हे वाचलं का?

दरम्यान, आज 23 मार्च रोजी राज्यातील हवामान कसं असेल, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> Pune Crime : जन्मदात्या बापानं 3 वर्षाच्या मुलाला गळा चिरुन संपवलं, पत्नीच्या चरित्र्यावर...

कसं आहे महाराष्ट्रातील आजचं हवामान?

राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये कोरडं हवामान असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. 

हे ही वाचा >> Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना

मार्च महिना सुरु होताच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याचं समोर आलं. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 41.2 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे हवामान विभागाने मोठा इशारा दिला होता. ज्या ठिकाणी अति उष्णता असेल, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या होत्या.

    follow whatsapp