Zara Patel news in Marathi, Rashmika Mandanna Deepfake video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओबद्दल लोक खूप आश्चर्य व्यक्त करताहेत. यामध्ये दिसणारी मुलगी अभिनेत्री रश्मिका मंदाना नसून, प्रत्यक्षात झारा पटेल आहे. पण तिच्या व्हिडीओशी छेडछाड करून अभिनेत्री रश्मिका मंदाना असल्याचं दाखवलं गेलं. हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. यामध्ये दिसणार्या मूळ तरुणीने या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. तिचे नाव झारा पटेल. तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक निवेदन जारी केले. या घटनेमुळे आपण खूप अस्वस्थ असल्याचे तिने सांगितले.
ADVERTISEMENT
झारा म्हणाली, ‘मला त्या महिला आणि मुलींच्या भविष्याची काळजी वाटते, ज्यांना सोशल मीडियावर स्वत:चे फोटो, व्हिडीओ पोस्ट करायला आजही भीती वाटते. त्यामुळे तुम्ही इंटरनेटवर जे काय पाहता त्याची सत्यता पडताळून घ्या. इंटरनेटवरील सर्व काही खरे नसते.
कोण आहे झारा पटेल?
या डीपफेक व्हिडिओमध्ये झाराचा चेहरा एडिट करण्यात आला असून त्यावर रश्मिकाचा चेहरा सुपरइम्पोज करण्यात आला आहे. ही मुलगी रश्मिका मंदाना नसून झारा पटेल आहे. झारा पटेल एक ब्रिटिश-भारतीय इन्फ्लुएन्सर असून तिचे Instagram वर 4.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती या प्लॅटफॉर्मवर बोल्ड कंटेंट शेअर करण्यासाठी ओळखली जाते.
Deepfake Video: रश्मिका मंदानाचा एवढा बोल्ड व्हिडीओ? हादरवून टाकणारं ‘हे’ प्रकरण काय?
तिच्या इन्स्टा बायोनुसार, ती पूर्णवेळ डेटा इंजिनिअर आणि मानसिक आरोग्य वकील आहे. यासोबतच ती तिच्या फॉलोअर्ससाठी अॅडल्ट कंटेंट तयार करते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक गुप्त लिंक देखील दिली आहे, जी वापरकर्त्यांना तिच्याशी संबंधित सामग्रीमध्ये प्रवेश आणि चॅट करण्यास अनुमती देते.
मूळ व्हिडिओ कधी शेअर केला होता?
झारा पटेलने 9 ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती काळ्या कपड्यांमध्ये लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘POV: तुम्ही माझ्यासाठी लिफ्टचा दरवाजा जवळजवळ बंद केला आहे.’ मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झाराचा चेहरा मॉर्फ करण्यात आला असून, त्यावर रश्मिकाचा चेहरा सुपरइम्पोज करण्यात आला आहे.
Maratha Reservation : शंभूराज देसाई छगन भुजबळांवर संतापले, ”मोठेपणा घेण्यासाठी…”
या व्हिडिओबाबत रश्मिका मंदाना X वर पोस्ट करत म्हणाली, ‘मला हे शेअर करताना खूप वाईट वाटत आहे आणि मला माझा डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन पसरवल्याबद्दल बोलायचे आहे. खरे सांगायचे तर, असे काहीतरी केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत भीतीदायक आहे. आज तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे खूप नुकसान होत आहे.
डीपफेक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून बदललेले चित्र किंवा व्हिडिओ होय. अलीकडच्या काळात चुकीची माहिती वेगाने पसरत आहे. अनेकदा फेक व्हायरल पोस्ट या संबंधित आहेत. याआधी टॉम हँक्स, क्रिस्टन बेल यांच्यासह अनेक सेलिब्रिटीही अशा घटनांना बळी पडले आहेत.
ADVERTISEMENT