Viral Video: आरारारारा! गेट वे ऑफ इंडियाजवळ ब्रा अन् टॉवेलवर तरुणी थिरकली, डान्स सुरु होताच लोक जमले अन्...

Girl Bold Dance Video Viral : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अंगावर शहारे उठतील असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत.  

Mumbai Girl Bold Dance Viral Video

Mumbai Girl Bold Dance Viral Video

मुंबई तक

14 Feb 2025 (अपडेटेड: 14 Feb 2025, 05:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ब्रा आणि टॉवेलवर तरुणीने भन्नाट डान्स

point

गेट वे ऑफ इंडियाजवळ लोकांची जमली मोठी गर्दी

point

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी संतापले

Girl Bold Dance Video Viral : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अंगावर शहारे उठतील असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत.  काही व्हिडीओ लोटपोट हसवण्यासारखे असतात तर काही व्हिडीओंना पाहिल्यावर अश्रूंचा बांधा फुटतो. पण नुकताच एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. कारण हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  एक तरुणीने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ चक्क ब्रा आणि टॉवेलवर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या तरुणीला चांगलच सुनावलं आहे. 

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ पर्यटकांची मोठी गर्दी झाली असताना एक तरुणी ब्रा आणि टॉवेल घालून त्या ठिकाणी पोहचते अन् रिल बनवण्यासाठी भन्नाट डान्स करते. या तरुणीने बोल्ड आऊटफीटवर चक्क गेट वे ऑफ इंडियाजवळ डान्स केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. 

हे ही वाचा >>  Palghar : काका आणि भावानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भपातही केला आणि...

इन्स्टाग्रामवर रिल बनवून लोकप्रिय होण्यासाठी अनेक तरुणी बोल्ड डान्स करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे एखाद्या सार्वजनिक ठिकाणीही काही तरुणी अश्लील डान्स करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या गेट ऑफ इंडियाजवळ घडल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलंय.

हे ही वाचा >> Russian Beer वर महात्मा गांधी, मदर तेरेसांचा फोटो? खरे की खोटे? वाचा सविस्तर...

तरुणीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. @Ks_Jaatni नावाच्या एक्स हँडलवर या तरुणीच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, अशा लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, लोकप्रिय होण्यासाठी लोक कोणतीही हद्द पार करतात. अन्य एका यूजरने म्हटलं, काहीही बघण्याचं लायक नाहीय. 

    follow whatsapp