सासू अनिता जावयासोबत का पळाली? खुद्द राहुलने केला खळबळजनक खुलासा; म्हणाला, "मी लग्नासाठी..."

Aligarh Viral Love Story : अलिगढमधून पळून गेलेल्या सासू आणि जावयाची प्रेमकहाणी आता नव्या वळणावर आली आहे. या लव्ह स्टोरीत दररोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत

Viral Love Story Latest Update

Viral Love Story Latest Update

मुंबई तक

18 Apr 2025 (अपडेटेड: 19 Apr 2025, 01:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

...म्हणून सासू अनिता जावई राहुलसोबत पळाली

point

"आतापर्यंत फक्त एका महिलेसोबत पळालो, पण..."

point

जावई राहुलने सासू अनिताबाबत नेमकं काय म्हटलं?

Aligarh Viral Love Story : अलिगढमधून पळून गेलेल्या सासू आणि जावयाची प्रेमकहाणी आता नव्या वळणावर आली आहे. या लव्ह स्टोरीत दररोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. यावेळी जावई राहुलने सासूसोबतच्या प्रेमप्रकरणाचा खळबळजनक खुलासा केला आहे. राहुल महिलांना फूस देऊन त्यांच्यासोबत पळून जायचा, असा आरोप त्याच्यावर केला जात आहे. अशातच राहुलने या आरोपांचं खंडन करत या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आणली आहे. 

हे वाचलं का?

आतापर्यंत फक्त एका महिलेसोबत पळाला

जावई राहुलने त्याच्या जुन्या प्रेमकहाणीबाबत म्हटलं की, अनिता देवीनंतर फक्त एका महिलेसोबत तो पळाला होता. याशिवाय आजपर्यंत कोणत्याच महिलेसोबत पळाला नसल्याचं राहुलने म्हटलंय. अनिता देवीच्या आधी ज्या महिलेसोबत पळून गेलो होतो, ती महिला हरदोई येथील होती. पण काही काळानंतर ग्रामपंचायतीने हे प्रकरण शांतपणे मिटवलं. पण ती महिला माझ्यासोबत राहिली नाही. आम्ही दोघेही वेगळे झालो.

हे ही वाचा >> Today Gold Price: आता आपण फक्त आकडे मोजायचे... याचा 'पॅटर्नच' आहे वेगळा, सोन्याचे भाव ऐकून फुटेल घाम!

अनिताच्या भल्यासाठी तिच्यासोबत पळालो

राहूलने म्हटलंय की, अनिताला पळवून नेणं त्याची मजबूरी होती. नाहीतर अनिताने चुकीचं पाऊल उचललं असतं. अनिताचे कुटुंबिय मला खूप त्रास देत होते. मी लग्नासाठी शेरवानी सुद्धा खरेदी केली होती. पण अनिताचा फोन आला आणि तिने अलिगढमधून बाहेर जाण्यास सांगितलं.

दरम्यान, अनिताचे पती जितेंद्र हे सर्व घडल्यानंतरही तिच्यासोबत संसार थाटायला तयार आहेत. मुलं आईशिवाय खूप दु:खी आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच अनितासोबत संसार करायचा आहे. माझा संसार पुन्हा सुरु झाला पाहिजे. मी अनिताचा स्वीकार करायला तयार आहे. आता मी माझ्या मुलांना एकटा सांभाळत आहे.

हे ही वाचा >> कराडच्या Encounter चा दावा, EVM मशीन आणि मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा पोलीस रणजीत कासलेची A to Z माहिती

परंतु, परिस्थिती आता ठीक नाहीय. पत्नी जाताना 3 लाख 50 हजार रुपये कॅश, 5 लाख 50 हजारांचे दागिने आणि 1 लाख रुपयांचे नाणे सोबत नेले होते. हे सर्व पुन्हा मिळाले पाहिजेत. राहुल महिलांना फूस लावून त्यांच्यासोबत पळून जातो आणि त्यांच्याकडे असलेले पैसे उकळतो, असा आरोपही जितेंद्रने राहुलवर केला आहे.

    follow whatsapp