Delhi Murder : तारीख 20 ऑक्टोबर 2023. ठिकाण राजधानी दिल्लीतील टिळक नगर परिसर. एका शाळेजवळ एका परदेशी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत काही लोकांना दिसला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महिलेचे वय 30 असल्याचे समोर आले आहे. ती स्वित्झर्लंडची रहिवासी होती.
ADVERTISEMENT
तीन दिवसांपूर्वी तिची हत्या झाली होती. या परदेशी महिलेची हत्या कुणी केला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात आले. शाळेसमोरच एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राखाडी रंगाची सँट्रो कार दिसली. या गाडीतून एका तरुणाने मृतदेह शाळेजवळ फेकून दिला होता.
पोलिसांनी कसा पकडला आरोपी?
कारचा नंबर ट्रेस करून ही कार एका परदेशी महिलेच्या नावाने विकत घेतल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी महिलेचे कॉल डिटेल्स काढले असता त्यात गुरप्रीतचे नाव समोर आले. तो महिलेचा मित्र होता. मृतदेहाची विल्हेवाट लावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने गुरप्रीतला अटक केली.
हे ही वाचा >> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story
परदेशी महिलेशी कसा भेटला गुरप्रीत?
गुरप्रीत सिंगने पोलिसांना सांगितले की, तो स्वित्झर्लंडमध्ये परदेशी महिलेला भेटला होता. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर गुरप्रीत सिंग अनेकदा स्वित्झर्लंडला जाऊन या महिलेला भेटायचा. गुरप्रीतला संशय होता की, महिलेचे दुसऱ्या पुरुषाशीही संबंध आहेत. त्यानंतर आरोपीने अतिशय हुशारीने महिलेला आधी भारतात बोलावले. त्यानंतर कोणत्या तरी बहाण्याने तो महिलेला एका खोलीत घेऊन गेला. तिला सांगितले की मी तुझे हात पाय बांधून तुला जादू दाखवतो. यानंतर आरोपीने महिलेची हत्या केली.
आधीच रचला होता हत्येचा कट
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महिलेने गुरप्रीतला लग्नासाठी विचारणा केली होती. त्यानंतर गुरप्रीतने महिलेला दिल्लीला बोलावले. 10 ऑक्टोबरला ती महिला दिल्लीला पोहोचली आणि टागोर गार्डनमधील हॉटेलमध्ये थांबली.
हे ही वाचा >> PSI Somnath zende : Dream11 मुळे निलंबन, PSI झेंडे कसे फसले?; अधिकाऱ्याने सांगितली Inside Story
महिला काही दिवस हॉटेलमध्ये राहिली. त्यानंतर 17 तारखेला गुरप्रीत हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने महिलेचे हॉटेलमधून चेक आऊट केले. मग तो महिलेला अनोळखी ठिकाणी घेऊन गेला. तिथेच त्याने महिलेची हत्या केली. गुरप्रीतने आधीच हत्येचा कट रचला होता. कारण ज्या सेकंड हँड सॅन्ट्रोमध्ये त्याने महिलेला नेले ती त्याच परदेशी महिलेच्या नावाने खरेदी केली होती.
गुरप्रीतचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हत्येनंतर गुरप्रीत खूप घाबरला होता. मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची हे त्याला समजत नव्हते. तोपर्यंत मृतदेह कारमध्ये जनकपुरीच्या बी-१ ब्लॉकमध्ये पडून होता. मात्र दुर्गंधी येऊ लागल्याने गुरप्रीतने गाडी टागोर गार्डनमध्ये नेली. येथे त्याने मृतदेह शाळेच्या भिंतीच्या मागे फेकून दिला. मात्र त्याची कृत्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार याची कल्पना त्याला आलीच नाही.
हे ही वाचा >> Meera Borwankar: अजित पवारांना थेट भिडलेल्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण?
पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळीच गुरप्रीतला अटक केली. पोलिसांनी गुरप्रीतच्या घराची झडती घेतली असता तेथून अडीच कोटी रुपयेही सापडले. सध्या आरोपी गुरप्रीत पोलिसांच्या ताब्यात आहे.
जीवे मारण्यापूर्वी महिलेवर अत्याचार
पोलीस उपायुक्त विचित्र वीर यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की, दिल्ली महानगरपालिकेच्या शाळेच्या भिंतीलगत एका महिलेचा मृतदेह पडून आहे. पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानंतर हा मृतदेह परदेशी महिलेचा असून तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. खून करण्यापूर्वी आरोपीने महिलेवर अत्याचार केला होता, त्यामुळे तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT