4 मुलं, कोट्यवधींची संपत्ती.. या आईची कहाणी वाचून तुमचंही काळीज पिळवटेल!

मुंबई तक

06 Apr 2023 (अपडेटेड: 06 Apr 2023, 09:03 AM)

Agra 87 year old mother live in old age home : 87 वर्षीय विद्या देवी एकेकाळी आगराच्या आलिशान बंगल्यात राहायची, मात्र आता तिच्यावर वृद्धाश्रमात आयुष्य घालवण्याची वेळ आलीय. ही घटना वाचून संपुर्ण राज्य हादरलंय.

Agra 87 year old mother live in old age home

Agra 87 year old mother live in old age home

follow google news

Agra 87 year old mother live in old age home :हरियाणा कॅडरच्या आयएएस ऑफिसरच्या आजी-आजोबांना दोन वेळचे जेवण मिळत नसल्याने गोळ्या खाऊन जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच आता आणखीण एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात करोडोंची संपत्ती आणि चार मुलांची आई असून देखील एका आईवर वृ्द्धाश्रमात (old age home) राहायची वेळ आली आहे. विद्या देवी असे 87 वर्षीय महिलेचे नाव आहे. एकेकाळी ही महिला आगराच्या आलिशान बंगल्यात राहायची, मात्र आता तिच्यावर वृद्धाश्रमात आयुष्य घालवण्याची वेळ आलीय. ही घटना वाचून संपुर्ण राज्य हादरलंय. (87 year old mother of agra live in old age home after having four sons)

हे वाचलं का?

आग्र्याच्या प्रसिद्ध डोळ्यांच्या हॉस्पिटलचे संस्थापक गोपी चंद्र अग्रवाल यांचे नाव मोठ-मोठ्या करोडपतींच्या यादीत घेतले जायचे. गोपी चंद्र अग्रवाल यांच्याकडे करोडोची संपत्ती होती. त्यांची बायको विद्या देवी पतीसोबत आलिशान बंगल्यात राहायची. विद्या देवी आणि गोपी चंद्र अग्रवाल यांना 4 मुले आहेत. विद्या देवीने तिच्या 4 मुलांना चांगले शिक्षण दिले आणि त्यांचे पालण पोषण केले होते. एका आई- वडिलांनी मुलांचे पालन पोषण जसे केले पाहिजे तसे पालन पोषण त्यांनी केले होते. पण त्यांना कुठे माहिती होते, ज्या मुलांना त्यांनी मोठं केले आहे, तिचं मुल त्यांना वृद्धाश्रमात (old age home) ठेवतील.

हे ही वाचा : प्रेयसीचे दुसऱ्यावर जडलं प्रेम, नंतर…; बॉयफ्रेंडच्या कृत्याने चिंचवड हादरलं!

पतीच्या मृत्यूनंतर आयुष्य बदललं…

विद्या देवी यांचे पती गोपी चंद्र अग्रवाल यांची आजपासून 13 वर्षापु्र्वीचं मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर विद्या देवीने आपल्या चारही मुलांच एक-एक करून लग्न केलं होतं.सर्व मुलांच लग्न झाल्यानंतर विद्या देवींच आयुष्य खुपच अवघड झालं. मुलांनी आईवर दबाव टाकून संपत्तीचे हिस्सेदारी मागितली आणि एकमेकांमध्ये वाटून घेतली. यानंतर आई आपल्या सर्वांत मोठ्या मुलाच्या घरी राहायला गेली.

यमुनेत फेकून द्या…

आई मोठ्या मुलाकडे राहायला जाताच परीस्थिती आणखीणच बिघडली. मोठ्या सुनेने टोमणे मारायला सुरूवात केली. त्यानंतर ती दुसऱ्या मुलाकडे राहायला गेली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सुनेने देखील हाच कित्ता गिरवला. या दरम्यान एका सुनेने तिला अंगातून वास येत असल्याचे टोमणे मारले, तर आणखीण एकीने तर तिला यमुनेत फेकून देण्याचा सल्ला दिला.

हे ही वाचा : 3 वर्षांपासून देत होता धमकी… अखेर विळा घेऊन आला अन् भर रस्त्यात कापलं महिलेचं नाक

या घटनेची माहिती अग्रवाल महिला मंचच्या अध्यक्षा शशी गोयल यांना मिळाली होती. त्यानुसार शशी गोयल यांनी विद्या देवीच्या मुलांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहिच फरक पडला नाही.त्यानंतर शशी गोयल यांनी त्यांना रामलाल वृद्धा आश्रमात नेले. त्यामुळे आता कधी एकेकाळी आलिशान बंगल्यात राहणारी विद्या देवी सध्या एका छोट्याशा खोलीत आयुष्य काढते आहे. मुलं जीवंत असताना देखील तिच्यावर आलेली ही वेळ अनेकांना संताप आणतेय.

    follow whatsapp