देशात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, त्याच वेगानं 'डिजिटल अटक'सारखे नवे प्रकारही समोर आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होत आहे. ठाण्यातही एक अशीच घटना घडली आहे. सायबर ठगांनी 24 वर्षीय एअर होस्टेसकडून तब्बल 10 लाख रुपये उकळल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
आतापर्यंत समोर आलेल्या वेगवेगळ्या घटनांप्रमाणेच यामध्येही फसवणूक करणाऱ्याने महिलेला सरकारी अधिकारी म्हणून बोलत असल्याची बतावणी केली आणि सांगितलं की, ती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकली आहे. हीच धमकी देऊन केस बंद करण्याच्या नावाखाली गुंडांनी त्याच्याकडून 10 लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले.
हे ही वाचा >> Pimpri Chinchwad : ग्राहकानं 595 देऊन पिझ्झा ऑर्डर केला, घास घेताच तोंडात चाकूचा तुकडा घुसला, पिंपरी चिंचवडमधील प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणाऱ्या एअर होस्टेसला 23 नोव्हेंबर 2024 रोजी एका अनोळखी फोन नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्यानं तिला सांगितलं की, त्यांनी पाठवलेलं पार्सल इराणमध्ये पोहोचलं नाही. त्यावर एअर होस्टेस म्हणाल्या मी कोणतंही पार्सल पाठवलं नाही. कॉल करणाऱ्यानं व्हिडिओ कॉलद्वारे सांगितलं की, त्यांचं नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आलं आहे आणि सांगेल त्या सूचनांचं पालन करा नाहीतर तुम्हाला अटक करू अशी धमकी दिली.
हे ही वाचा >> राजन साळवींचा उद्धव ठाकरेंकडून पाणउतारा, 'मातोश्री'मधील प्रचंड खळबळजनक Inside स्टोरी
यानंतर कॉलरने एअर होस्टेसच्या मोबाईल नंबरवर काही लिंक पाठवून फोन डिस्कनेक्ट केला. मात्र, फोन ठेवण्यापूर्वी 9 लाख 93 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. सर्व काही झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
ADVERTISEMENT
