Thane Crime: इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि ब्युटीशियन प्रिया सिंह (Priya Singh) हिट अँड रन प्रकरणातील सर्व आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी कसरवदवाली पोलिसांनी अश्वजीत गायकवाड (Ashwajit Gaikwad), रोमिल पाटील आणि सागर शेळके यांना अटक करून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांच्या तपास कार्यावरच संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील प्रिया सिंह यांनी पोलिसांवर गंभीर आरोपही केले आहेत. पोलिसांवर आरोप करत असतानाच शनिवारी रात्री काही पोलीस माझ्याकडे आले होते, त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पेपरवर माझी जबरदस्तीने सही (sign) घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी त्यांना नकार देताच ते तिथून रागाने निघून गेले असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे त्यानंतर प्रिया सिंहने मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे मदतीची याचना केली आहे.
ADVERTISEMENT
जबरदस्तीने सह्या घेतल्या
प्रिया सिंह हिने या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, शनिवारी रात्री काही पोलीस माझ्याकडे आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पेपरवर त्यांनी सह्या करण्यासाठी मला जबरदस्ती करत होते. त्यासाठी त्यांच्याकडून मला दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याकडे वकील आणि माझ्यासोबत माझे कुटुंबीय कोणीच नसल्याने मी पोलिसांना नकार दिला होता. तुम्ही आज सही करा जे काय होईल त्याचा उद्या विचार करा असा सल्लाही पोलीस देत होते. त्या कागदावर सही घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला होता. मात्र मी नकार दिल्यानंतर ते रागाने तिथून निघून गेले होते. त्यामुळे प्रिया सिंहने पोलिसांच्या तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित करून रात्री आलेले पोलीस कोण होते, आणि एवढ्या घाईने ते रात्रीच का सही घेत होते असा सवालही तिने पोलिसांना केला आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिली पाहिजे असंही तिने म्हटले आहे.
पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर विश्वास
बॉयफ्रेंडने कार पायावर घालून जखमी केलेल्या प्रिया सिंहने आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे दयेची याचना मागितली आहे. यावेळी तिने म्हटले आहे की, मला फक्त न्याय हवा आहे आणि तो न्या मला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मिळवून देतील असा विश्वास तिने बोलून दाखवला आहे. प्रिया सिंहने आपल्या बाबतीत घडलेली घटना सगळी तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, माझा उजवा पाय तुटलेला आहे. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली आहे. तर पायामध्ये आता रॉड टाकला आहे. माझ्या सगळ्या शरीरावर आता सगळ्या जखमा झाल्या आहेत.
हे ही वाचा >> अवकाळीवरून CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा, ‘शेतकरी अडचणीत असताना आम्ही…’
पोटाच्या मागील बाजूलाही गंभीर इजा झाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे आता मला तीन ते चार महिने मला विश्रांतीची गरज आहे. तर त्यानंतर चालण्यासाठी किमान मला सहा महिने लागणार आहेत. त्यातच माझं सगळं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे. त्यातच आता मी काम करत नसून गेल्या पाच वर्षापासून मी रिलेशनशिपमध्ये होते असंही तिने सांगितले.
बायकोवरून झाले वाद
प्रिया सिंहने सांगितले की, अश्वजीतने मला 11 डिसेंबर रोजी सकाळी 3 वाजता कोर्टयार्ड हॉटेलमध्ये भेटायला बोलवले होते. त्यावेळी तिथे प्रियाने अश्वजीतला त्याच्या बायकोबरोबर बघितले, त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याच हॉटेलवर अश्वजीतने तिच्यावर हल्ला करून तिला जखमी केले. तिच्यावर हल्ला झाला त्यावेळी अश्वजीतचे मित्र रोमिल, प्रसाद आणि शेळकेनेही तिच्यावर हल्ला केला. कारमध्ये असलेली तिची बॅग आणि मोबाईल घेण्यासाठी ती जेव्हा कारकडे जात होती, त्याच वेळी तिला पाठीमागून कारची धडक देण्यात आली. नंतर तिच्यावर कार घालून ते तिघेही तिथून पळून गेले होते. त्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा
प्रिया सिंहच्या बहिणीच्या तक्रारीवरून आता जाणीवपूर्वक जखमी करणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, गंभीर इजा करणे, अपमान करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अश्वजीतच्या कुटुंबीयांनीही प्रिया सिंहविरोधात पोलिसांना काही गोष्टी सांगितल्या आहेत.
प्रियाही दारुच्या नशेत
ही घटना प्रियाने सांगितल्या प्रमाणे ही घटना पहाटे तीनची नाही तर रात्रीचे दीड ते दोन वाजताची आहे. प्रियाने त्यावेळी त्याला मेसेज करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर सतत त्याला तिने मेसेज केले. त्यानंतर ती कोर्टयार्ड हॉटेलमध्येही ती आली आणि पार्टीमध्ये ती जबरदस्तीनेच सहभागीही झाली, त्याच वेळी अश्वजीत हा आपल्या मित्रांसोबत होता, तर प्रिया सिंह ही दारुच्या नशेत होती असा आरोप अश्वजीतच्या कुटुंबीयांनीही केला आहे.
ADVERTISEMENT