Thane Crime : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) संचालकांचा मुलगा अश्वजीत गायकवाडवर (Ashwajit Gaikwad) त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंगने (Priya Singh) आपल्याला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अश्वजीत हा भाजप युवा मोर्चाचा अध्यक्षही आहेत. त्यामुळे आता प्रिया सिंगने या प्रकरणी पोलिसांच्या तपास कार्यावरच गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांचा दबाव
प्रिया सिंहने सांगितले की, काल रात्री काही पोलीस माझ्याकडे आले होते, त्यावेळी त्यांनी आपल्याला कागदावर सही करण्याची जबरदस्ती केली होती. मात्र त्यावेळी माझ्याकडे वकील नसल्याने मी त्याच्या सही करण्यासाठी नकार दिला, व त्यावेळी माझ्या घरचेही माझ्यासोबत कोणी नव्हते. मात्र पोलीस माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते असा गंभीर आरोपही तिने केला आहे. तुम्हाला काही विचार करायचा असेल तो तुम्ही उद्या करा मात्र आज सही करा असा तगादा पोलिसांनी लावला होता असंही प्रिया सिंहने सांगितले. तरीही मी सही केली नसल्यामुळे पोलीस रागाने तिथून निघून गेले.
अद्याप चौकशी का नाही
यावेळी प्रिया सिंह म्हणाली की, माझा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर प्रचंड विश्वास आहे. कारण या प्रकरणात मला फक्त न्याय हवा आहे. तर या प्रकरणी पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणात अश्वजीत अनिल गायकवाड आणि इतरांवर गुन्हा दाखल करून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. अश्वजीतची अद्याप चौकशी करण्यात आली नसून कारही गायब आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी लागणारे फॉरेन्सिक पुरावेही गोळा केले जात असून गुन्हा करण्यासाठी आलेल्या प्रत्येक गोष्टींचा तपास करून त्यांच्यावर कलम लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> ‘OBC विरोधात बोलणाऱ्यांचा…’, छगन भुजबळांचा थेट इशारा
सोशल मीडियावर व्यथा मांडली
प्रिया सिंहने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, ‘माझा उजवा मोडला आहे. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली. पायामध्ये रॉडही बसवावा लागला आहे. या दुर्घटनेमुळे सगळ्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. माझ्या हातावर, पाठीवर आणि पोटावर खोल जखमा झाल्या असून आता मला किमान 3 ते 4 महिने अंथरुणावरच पडून राहावे लागणार आहे. त्यानंतर 6 महिने चालण्यासाठी आधार घ्यावा लागेल अशी खंतही तिने व्यक्त केले. त्यातच माझ्या कमाईवर माझं कुटुंब चालत असून मी आता काम करू शकणार नसल्याचेही तिने म्हटले आहे.
रुग्णालयात येऊन धमकी
त्या पोस्टमध्ये प्रियाने हे ही लिहिले की मी अश्वजीतला 4 ते 5 वर्षांपासून डेट करत होते. तो आता मला भेटायला आला नाही, मात्र त्याच्यापासून मला धोका आहे. त्याचे काही मित्र दोन दिवसांपासून सतत रुग्णालयात येत आहेत. मी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे ते माझ्या बहिणीलाही धमकावत आहेत. त्यामुळे त्याची मला भीती वाटत असून माझ्या कुटुंबाला त्याच्यापासून धोका असल्याचेही तिने म्हटले आहे.
विचित्र वागला
या घटनेविषयी प्रिया सांगितले की, सोमवारी पहाटे 4 वाजता मला अश्वजीत गायकवाडचा फोन आला. त्यानंतर मी त्याला भेटायलाही गेले. तिथे पोहचल्यावर लक्षात आलं की, अश्वजीत त्याच्या कुटुंबीयांसोबत आणि आमच्या काही मित्रांसोबत तो कार्यक्रमाला आला होता. तिथे गेल्यावर काही मित्रही मला भेटले. त्यावेळी मला हेही लक्षात आले की अश्वजीत माझ्यासोबत विचित्र वागत आहे. त्यावेळी मी त्याला विचारलेही की काय झाले ? त्यानंतर मी त्याच्यासोबत एकटीच बोलले आणि बाहेर येऊन मी त्याची वाट बघू लागलो.
सागर उडा दे इसको
तो ज्यावेळी मित्रांसोबत बाहेर आला त्यावेळी त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मित्र रोमिल पाटीलने मला अडवले. त्यानेही माझ्यासोबत चुकीचा वागू लागला. त्यानंतरच खरा वाद सुरू झाला. माझा बॉयफ्रेंडकडून आणि त्याच्या मित्राकडून मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी त्याला हे ही सांगितले की, तुम्ही असं वागू नका. मात्र त्यावेळी त्याने मला चप्पलने मारले आणि माझा गळाही दाबला. ज्यावेळी मी त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने माझा हात चावला होता.
हा वाद चालू असताना ते सगळे त्याच्या कारकडे गेले. त्यावेळी त्या मी माझा फोन आणि बॅग घेण्यासाठी अश्वजीतच्या कारकडे गेले. त्यावेळी त्याने तिथेही मला मारहाण केली, माझं साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या रेंज रोव्हर डिफेंडरजवळ गेले तेव्हा ड्रायव्हर सागरला तो म्हणाले की, सागर उडा दे असंही त्याने सांगितले.
रस्ताने जाणाऱ्याने केली मदत
अश्वजीतने सांगितल्याप्रमाणे त्याच्या ड्रायव्हरने कारचा वेग वाढवून मला जोरदार धडक दिली.त्यानंतर मी खाली पडली. कारचे मागचे डावे चाक माझ्या उजव्या पायावरून गेले होते. त्यानंतर 20 ते 30 मीटरवर जाऊन ते थांबले. त्यावेळी मदतीसाठी मी त्यांना हाक मारत राहिले मात्र ते आले नाहीत, ते त्यावेळी पळून गेले. त्यावेळी अर्धातास मी तशी पडून होते, मात्र त्यानंतर रस्त्याने एका व्यक्तीने मला पडलेले बघून त्याने पोलिसांनी मी रस्त्यात जखमी अवस्थेत पडल्याचे सांगितले. त्या व्यक्तीनेच मला त्यावेळी मदत केली असंही तिने सांगितले.
ADVERTISEMENT