अयोध्या: अयोध्येत लग्नाच्या पहिल्या रात्री झालेल्या दुहेरी मृत्यूचे गूढ उलगडण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. शिवानीला मारल्यानंतर प्रदीपने आत्महत्या का केली? हा घाईघाईने घेतलेला निर्णय होता की सुनियोजित होता? शेवटी, दोघेही खोलीत गेल्यानंतरच प्रदीपच्या मोबाइलवर मेसेज का आला? सध्या असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे ना पोलिसांना सापडत आहेत ना कुटुंबातील सदस्यांना. पोलिसांनी अनेक वेगवेगळ्या बाजूने या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. परंतु अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.
ADVERTISEMENT
प्रदीपच्या मोबाइलवरचा शेवटचा मेसेज अन्...
प्रदीप आणि शिवानीचे लग्न ठरल्यापासून दोघेही तासन्तास फोनवर बोलत होते. लग्नाच्या विधींमध्येही दोघेही खूप आनंदी दिसत होते. लग्नानंतर दोघं पहिल्या रात्री खोलीत प्रवेश करण्यापूर्वीही दोघे खूप आनंदी होते. कुटुंब आणि मित्रांसोबत काही हास्य आणि विनोदही झाले. आता प्रश्न असा पडतो की, खोलीत नेमके असे काय घडले की प्रदीपने इतके भयानक पाऊल उचलले.
हे ही वाचा>> Honeymoon सेलिब्रेट करताना प्रदीप आणि शिवानीचा कसा झाला मृत्यू? हादरवून टाकणारी गोष्ट आली समोर
असे सांगितले जात आहे की, प्रदीपला त्याच्या फोनवर काही मेसेज आला असावा ज्यामुळे त्याचा शिवानीशी वाद झाला आणि त्यानंतर प्रदीपने हे टोकाचं पाऊल उचललं असावं. या संपूर्ण प्रकरणात, प्रदीपच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजची वेळ ही गोष्ट भुवया उंचवणारी आहे.
प्रदीप-शिवानी रुममध्ये गेल्यावरच का पाठविण्यात आला मेसेज?
लग्नानंतर, जेव्हा वधू-वर त्यांच्या खोलीत गेले, तेव्हा काही वेळातच कोणीतरी प्रदीपला मेसेज केला. सूत्रांच्या माहितीनुसार, मेसेजच्या वेळेबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. ज्या व्यक्तीने मेसेज पाठवला त्याला शिवानीच्या पतीचा नंबर कसा मिळाला आणि त्याने दोघेही खोलीत असतानाच मेसेज का केला? असेही सवाल आता विचारले जात आहेत.
हे ही वाचा>> पोटच्या तीन मुलींवर वासनांध बापाकडून वारंवार बलात्कार, एका मुलीचा 4 वेळा गर्भपात
मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलेलं?
या प्रकरणात पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रदीपच्या मोबाइलवर आलेला शेवटचा मेसेज. या मेसेजबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, त्यात काहीतरी असं लिहिलं होतं ज्यामुळे प्रदीप आणि शिवानीमध्ये टोकाचा वाद झाला असावा. अयोध्या छावणीचे प्रभारी पंकज सिंह म्हणतात की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि पुरावे गोळा केले जात आहेत, लवकरच घटनेचा खुलासा केला जाईल, सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रदीपच्या मोबाइल फोनचा सीडीआर मिळवला आहे आणि प्रत्येक पैलूचा तपास सुरू आहे.
जर ही घटना अचानक घडली तर प्रदीपने लगेच आत्महत्या का केली?
सहसा गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु या प्रकरणात प्रदीपने लगेच आत्महत्या केली. यावरून असे दिसून येते की ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित होती किंवा असे काहीतरी घडले ज्यामुळे अचानक प्रदीपला हे पाऊल उचलावे लागले. या घटनेने वधू-वरांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. लग्नाचा आनंद इतक्या लवकर शोकात बदलेल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
संपूर्ण प्रकरण काय?
ही घटना अयोध्या जिल्ह्यातील राजेपूर गावातील आहे, जिथे प्रदीप आणि शिवानी यांचे लग्न थाटामाटात पार पडले होते. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर, वधू आणि वर रात्री त्यांच्या खोलीत गेले. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व काही सामान्य दिसत होते, पण सकाळी दार उघडले नाही तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला. यानंतर जे दिसले त्यामुळे सगळ्यांना हादराच बसला.
कारण शिवानी बेडवर बेशुद्ध पडली होती आणि प्रदीप पंख्याला लटकत होता. या दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
ADVERTISEMENT
