Badlapur : बदलापूर पुन्हा हादरलं, प्रवाशांनी भरलेल्या रेल्वे स्थानकात बेछूट गोळीबार; घटनेचा VIDEO समोर

मिथिलेश गुप्ता

05 Sep 2024 (अपडेटेड: 05 Sep 2024, 09:27 PM)

Badlapur News : बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने दोन जणांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने रेल्वे स्थानकात खळबळ उडाली होती आणि प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले होते.

badlapur railway station firing case one accuse try to killed to people firng story badlapur video viral

बदलापूर रेल्वे स्थानकात बेछूट गोळीबार

follow google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरात पुन्हा हादरवून टाकणारी घटना

point

बदलापूरात रेल्वे स्थानकार बेछुट गोळीबार

point

गोळीबाराची संपूर्ण घटना कॅंमेरात कैद

Badlapur News : बदलापूर रेल्वे स्थानकात (Badlapur Railway Station) गोळीबार (Badlapur Firing) झाल्याची घटना  घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने दोन जणांवर गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे.  या घटनेने रेल्वे स्थानकात खळबळ उडाली होती आणि प्रवाशांमध्ये (Railway Passenger) भितीचे  वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video Viral) देखील समोर आला आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. (badlapur railway station firing case one accuse try to killed to people firng story badlapur video viral) 

हे वाचलं का?

बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. एका अज्ञात इसमाने दोघांवर गोळीबार केला. या गोळीबारानंतर आरोपी तरूणाने ट्रॅक मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता आरोपीने दोघांवर दोन राऊंड फायर केले. त्यानंतर तो ट्रॅकमधून पळून जाताना दिसला आहे. या संपूर्ण घटनेनंतर प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावर पसरले होते. 

हे ही वाचा : Gadchiroli Video : काळजावर वार... दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू, आई-वडिलांची मृतदेह खांद्यावर घेतला अन 15 किमी...

बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबारात एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शंकर संसारे असे या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीने रेल्वे ट्रॅकमधून धावत जावत पळण्याचा प्रयत्न केला होता.मात्र पोलिसांना त्याला ताब्यात घेण्यात यश आलं आहे. विकास पगारे असे या आरोपीचे नाव आहे. विकास पगारेने प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभ्या असलेल्या दोन जणांवर दोन राऊंड फायर केले होते. या फायरिंग नंतर रेल्वे स्थानकात प्रवाशांची पळापळ सुरु झाली होती. दरम्यान या घटनेंतर विकास पगारेने ट्र्रॅकवरून पळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली होती. 

हे ही वाचा : Shivaji Maharaj Statue: ''जो चूक करतो, तोच माफी मागतो'', पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी PM मोदींवर भडकले

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीतांमध्ये  पहिल्यांदा  बदलापूर येथील बाजारपेठ परिसरात पैशांवरून वाद झाला होता. या वादानंतर दोघेही रेल्वेस्थानकात दाखल झाले होते. यावेळी रेल्वे स्थानकात त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या  वादानंतर आरोपी विकास पगारे बंदूक काढून दोन जणांवर गोळीबार केला. या गोळीबारात शंकर संसारे नावाचा व्यक्ती जखमी झाला आहे. या घटनेनंतर पळून जाताना आरोपी विकास पगारे याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे. 

    follow whatsapp