पोलीस महिलेला फुटला मातृत्वाचा पाझर! बाळाला पाजलं अंगावरचं दूध, पण तपासातून समोर आली भयंकर माहिती

मुंबई तक

15 Sep 2024 (अपडेटेड: 15 Sep 2024, 08:28 PM)

Buldhana Crime News :  बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (10 सप्टेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक मन हेलावून टाकणारी घटना घडली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर

point

पोलीस महिलेला फुटला मातृत्वाचा पाझर, बाळाला पाजलं अंगावरचं दूध

point

पोलीस तपासात भयंकर माहिती उघड

जका खान :-

बुलडाणा :  बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (10 सप्टेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. एक दिवसाचं भुकलेलं नवजात बाळ अगदी टाहो फोडून रडत होतं. जणू आपल्या आईलाच आवज देत होतं. यावेळी आपली ड्युटी संपवून महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे घरी निघाल्या होत्या. (buldhana crime news a woman constable police fed her milk to an unknown new born girl in police station after the investigation Shocking incident revealed)

हे वाचलं का?

पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत असताना त्यांना एक भुकेने व्याकूळ झालेली नवजात मुलगी रडताना दिसली. तिची आईही तिच्यासोबत नव्हती. प्रकरण काय आहे याचा कसलाही विचार न करता योगिता यांच्यातील मातृत्वाला पाझर फुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना त्या निरागस बाळाला दूध पाजता येईल का, अशी विचारणा केली. 

हेही वाचा : Govt Job: अरे व्वा! SBI मध्ये होतेय मॅनेजर पदांवर भरती... पण, 'या' उमेदवारांनाच करता येणार अर्ज 

मुलीच्या रडण्याने सर्व पोलीस कर्मचारी काळजीत पडले होते, लगेच महिला पोलीस कर्मचारी योगिता यांना नवजात मुलीला दूध पाजण्यास परवानगी देण्यात आली. अनोळखी मुलीनेही अनोळखी आईच्या छातीला बिलगून दूध पिण्यास सुरुवात केली. 15 ते 20 मिनिटे दूध पिल्यानंतर निरागस मुलगी झोपी गेली. मात्र पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या तपासात जी माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक होती.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना मंगळवार 10 सप्टेंबरची आहे. एक जोडपं बुलडाण्याच्या अनाथाश्रमात आलं आणि म्हणालं की, ते लोणार जिल्ह्यातून आले आहेत. त्यांनी ही मुलगी एका वेड्या बाईसोबत पाहिली, जर ती मुलगी त्या वेड्या बाईकडे राहिली तर ती मरेल, म्हणून आम्ही तिला तुमच्याकडे सोपवत आहोत. अनाथाश्रमातील लोकांनी त्या जोडप्याला पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यास सांगितले. काय करावं, या द्विधा मनस्थितीत दाम्पत्य होतं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवसाची मुलगी भुकेने व्याकूळ होत रडत होती. रात्री आठच्या सुमारास या दाम्पत्याने त्या निरागस मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी अनाथाश्रमाला सांगितलेली गोष्ट एसएचओ नरेंद्र ठाकरे यांना सांगितली. प्रशासन याबाबत बुलडाणा एसएचओ नरेंद्र ठाकरे यांनी लोणार पोलीस ठाण्याचे अधिकारी निमेश मेहेत्रे यांना माहिती दिली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. 

लोणार पोलिसांनी या दाम्पत्याकडे चौकशी केली असता, ही मुलगी या दाम्पत्याची नात असल्याचे समोर आले. त्यानंतर या दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीशी कोणाचे तरी अनैतिक संबंध होते, त्यामुळे ती गर्भवती राहिल्याचे उघड झाले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लोणार पोलिसांनी तत्काळ आपले खबरी पाठवून प्रकरणाचा तळ गाठला, तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देणाऱ्या मध्यमवयीन आरोपीला अटक केली. लोणार पोलीस ठाण्यात मध्यमवयीन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Ganesh Visarjan 2024: बाप्पाचं विसर्जन घरीच करताय? मग थोडं थांबा...

पोलीस प्रशासनाने या निष्पाप नवजात मुलीला बुलडाण्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवले, सिव्हिल सर्जनने तिला आयसीयूमध्ये ठेवले असून, मुलीला किमान 15 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सध्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. योगिता डुकरेही कर्तव्य संपवून त्या निरागस मुलीला पाहाण्यासाठी रुग्णालयात चक्कर मारतात.

महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी दाखवलेल्या माणुसकीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. उल्लेखनीय म्हणजे योगिता डुकरे यांना 1 वर्षाची मुलगी देखील आहे. एवढ्या मोठ्या मनाच्या योगिता डुकरे यांना पती आणि सासरच्यांनी मुलीला जन्म दिल्याने वेगळे केले आहे, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

    follow whatsapp