Ulhasnagar Crime latest Update: बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता उल्हासनगरमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील पीटी शिक्षकाने (57) सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची संतापजनक घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. (The recent incident of two minor girls sexually assaulted in Badlapur, Ulhasnagar, has come to light in a shocking incident, police arrested school teacher)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला अटक केल्यानंतर भाजप आमदार कुमार आयलानी यांनी शाळेतील संचलाकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर शाळेतील संचालकांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय, जेव्हा आम्हाला या धक्कादायक घटनेबाबत समजलं, त्याचवेळी आणि पीडित कुटुंबा आणि मुख्याध्यापकांना पोलीस स्टेशनला पाठवलं आणि तक्रार नोंदवली.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार, पण कधी अन् किती वाजता?
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये असणाऱ्या एका नामांकीत शाळेत ६ सप्टेंबरला ही घटना घडली. मुलगी शाळेत जायला तयार नव्हती, त्यावेळी या घटनेचा पर्दाफाश झाला. पीडित मुलीच्या आईने तिला शाळेत न जाण्याबद्दल विचारलं, त्यानंतर पीडिताने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईन घडलेल्या घटनेबाबत कुटुंबातील इतर लोकांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली.
हे ही वाचा >> Virat Kohli vs Babar Azam: विराट कोहली की बाबर आझम? 114 इनिंगनंतर कोण आहे 'वनडे'चा किंग?
पोलिसांच्या माहितीनुसार, (पीटी) शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण देणाऱ्या आरोपी शिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. त्यानंतर भीतीमुळं ती मुलगी शाळेत गेली नाही. हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं आणि एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT