Bengaluru : ‘तुझ्या मरणानंतरच माझी सुटका होईल…’, आईला तडफडून संपवणाऱ्या मुलीची खळबळजनक कबुली

मुंबई तक

14 Jun 2023 (अपडेटेड: 14 Jun 2023, 04:18 PM)

Crime News: बंगळुरूमध्ये एका महिलेने तिच्या आईची हत्या केल्यानंतर अत्यंत खळबळजनक कबुली जबाब दिला आहे. पाहा महिलेने नेमकं काय म्हटलंय

bengaluru daughter murder mother dead body in suitcase police station crime news

bengaluru daughter murder mother dead body in suitcase police station crime news

follow google news

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) 12 जून रोजी एक अत्यंत भयंकर घटना घडली. 12 जूनला बंगळुरुतील एका पोलीस स्टेशनमध्ये एक महिला निळ्या रंगाची ट्रॉली बॅग घेऊन आली होती. कदाचित ही महिला एफआयआर नोंदवण्यासाठी आली असावी, असे पोलिसांना वाटले. पण तिने पोलिसांना जी गोष्ट सांगितली त्याने पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. महिलेने आपले नाव सोनाली सेन असल्याचे पोलिसांना सांगितले. जी फिजिओथेरपिस्ट आहे. पोलिसांनी तिला तिथे येण्याचे कारण विचारले असता तिने त्यांना सांगितलं की तिने तिच्या आईची हत्या (Mother Murder) केली आहे. (bengaluru daughter murder mother dead body in suitcase police station crime news)

हे वाचलं का?

हे ऐकून पोलिसांना वाटले की, कदाचित ती महिला एकतर मानसिक रुग्ण असावी किंवा ती विनोद करत आहे. मात्र महिलेने पुन्हा पोलिसांना सांगितलं की, तिने तिच्या आईची हत्या केली असून तिचा मृतदेह सोबत असलेल्या बॅगेत भरुन आणला आहे.

हे ऐकून पोलिसांचे धाबे दणाणले. त्यावेळी पोलिसांनी तिला सांगितलं की, तुझ्याकडची बॅग उघडून दाखव. त्यावर सोनालीने कोणतेही आढेवेढे न घेता बॅग उघडून दाखवली. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह होता. जो हात-पाय दुमडून बॅगेत भरण्यात आला होता. त्यासोबतच एका वृद्ध व्यक्तीचा फोटोही होता.

सोनालीने सांगितले की, हा तिच्या वडिलांचा फोटो आहे. ती म्हणाली की, ‘माझी आई मला वारंवार मारुन टाक असं सांगत होती. म्हणूनच मी तिला मारले.’ महिलेचे हे वक्तव्य ऐकून पोलिसांचाही विश्वास बसला नाही. त्यांनी महिलेला खुर्चीवर बसवले आणि नंतर तिला घडलेली घटना तपशीलवार सांगण्यास सांगितले.

महिलेने सांगितले की, ती पश्चिम बंगालची रहिवासी आहे. तिचे वय 39 वर्षे आहे. सोनालीने सांगितले की, ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. लग्न झाल्यावर ती पतीसोबत बंगळुरूला स्थायिक झाली. सासरच्या घरी तिचा नवरा आणि सासू असे दोघे जण होते. तर तिचे आई-वडील हे कोलकाता येथे राहत होते.

हे ही वाचा >> सुप्रिया सुळे भडकल्या! मोदींच्या मंत्र्याचा संसदेतच करणार ‘करेक्ट कार्यक्रम’

काही वर्षांपूर्वी वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर तिची आई ही एकाकी पडली. आईला सांभाळायला कुणीच नव्हतं. त्यामुळे सोनालीने आईला बंगळुरूला बोलावून घेतलं. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही ठीक चाललं. मात्र नंतर तिची आई आणि सासू यांच्यात भांडणं होऊ लागली. दोघीचंही पटत नव्हती.

रोजच्या भांडणांना कंटाळून सोनालीने तिची नोकरी सोडून दिली. मात्र असे असतानाही तिची आई आणि सासू हे सारखे भांडत होते. रविवारीही त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सोनाली आणि तिच्या पतीने दोघींना कसेतरी शांत केले.

सोनालीचा नवरा त्याच्या आईला समजावू लागला, तर सोनाली तिच्या आईला. तेव्हा सोनालीची आई तिला म्हणाली, ‘तू मला मार. तरच ही भांडणं संपतील आणि तुमचे आयुष्य बरोबर होईल.’ सोनालीने आईला समजावले की, तू असं अजिबात बोलू नकोस. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सोनालीला जेव्हा जाग आली तेव्हा तिची आई आणि सासू पुन्हा भांडत असल्याचे तिला पाहायल मिळालं. सोनाली पुन्हा त्या दोघींची भांडण मिटविण्यास गेली.

आईला झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर गळा दाबला

यावेळी तिने सासूला दुसऱ्या खोलीत जायला सांगितले आणि ती आईला तिच्या खोलीत घेऊन गेली. तेव्हा पुन्हा तिची आई तेच बोलू लागली की तू मला मार. यावेळी सोनालीने आईला झोपेच्या अनेक गोळ्या खाण्यासाठी दिल्या. आणि म्हणाली की, हो माझे आयुष्य तुझ्या मृत्यूनंतरच चांगलं होईल. सोनालीच्या आईनेही विरोध केला नाही आणि त्या सर्व गोळ्या खाल्ल्या. मात्र गोळ्या घेताच आईची प्रकृती ढासळू लागली. पण आईला होणारा त्रास तिला पाहवला नाही म्हणून तिने तिचा गळा आवळून खून केला.

सासू आणि नवऱ्याला काहीही नव्हतं माहीत: सोनाली

सोनालीने सांगितले की, तिच्या पती किंवा सासूला याविषयी काहीही माहिती नाही. कारण त्यावेळी तिची सासू दुसऱ्या खोलीत होती. सोनालीचे हे म्हणणे ऐकून पोलिसांनी तिला अटक केली. सध्या तिची चौकशी सुरू आहे. त्याचवेळी तिच्या आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Mira Road : तुकडे कुकरमध्ये शिजवणे, कुत्र्यांना टाकणे; हा राक्षसीपणा येतो कुठून?

आता पोलिसांसमोर दोन प्रश्न आहेत. सोनालीने खरोखरच आईची इच्छा पूर्ण केली की रोजच्या भांडणांना कंटाळून तिने हे पाऊल उचलले? या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

    follow whatsapp