Bhandara Crime News :भाऊ-बहिणींमध्ये क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून भांडणे होत असतात. यात काही नवीन नाही. मात्र अशाच एका भांडणात आता बहिणीची (Sister Killed) दुदैवी हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भंडाऱ्याच्या (Bhandara) सोनुले गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. अश्विनी बावनकुळे असे या 20 वर्षीय मृत तरूणीचे नाव आहे. अश्विनीच्या मोठ्या भावानेच तिची हत्या केली आहे. या हत्येने आता भंडारा जिल्हा हादरला आहे. दरम्यान आता मोठ्या भावावर लहान बहिणीची हत्या करण्याची वेळ का आली? हे जाणून घेऊयात. (bhandara crime news brother killed his sister some dispute sonule village bhandara shocking crime story)
ADVERTISEMENT
भंडाऱ्याच्या सोनुले गावात बावनकुळे कुटुंब राहते. या बावनकुळे कुटुंबातील आशिष बावनकुळे या मोठ्या भावाचे त्याची लहान बहिण अश्विनी बावनकुळे हिच्यासोबत नेहमीच खटके उडायचे. खरं तर आशिषला अश्विनीचे गावातील एका तरूणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयातून तो नेहमीच अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.आणि याच कारणामुळे दोन्ही भांवडांमध्ये नेहमीच भांडणे व्हायची.
हे ही वाचा : Amol kolhe : अजित पवार खासदार कोल्हे यांचा करणार ‘विजय शिवतारे’, 2019 ची पुनरावृत्ती होणार…
दरम्यान घटनेच्या दिवशी देखील याच कारणामुळे दोघा भावंडांमध्ये भांडण झाली. या भांडणाच्यावेळेस घरी कुणीच नव्हते. मोठा भाऊ आशिषने बहिण अश्विनीवर पुन्हा संशय घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. यावेळी घरी कुणीच नसल्याने हा वाद आणखीणच विकोपाला गेला. या वादातून आशिषला राग अनावर झाला आणि त्याने अश्विनीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याने अश्विनीचा गळा आवळून तिची हत्या केली.
या हत्येनंतर मोठ्या मुलाला वाचविण्यासाठी कुटुंबियांनी मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याचा बनाव रचत अंत्यसंस्काराला सुरूवात केली होती. मात्र वरठीचे ठाणेदार अभिजीत पाटील यांना कुणीतरी गुप्त माहिती दिली. या माहितीच्या आधारावर कुटुंबियांची चौकशी केला असता पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यामध्ये अश्विनीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते.
हे ही वाचा : Opinion Poll 2024 : शिंदे-पवारांची साथ… भाजपवरच ‘बुमरँग’! ओपिनियन पोलचा अर्थ काय?
या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी मोठा भाऊ आशिष बावनकुळे (22) याला अटक केली आहे. ही घटना उघडकीस येताच भंडारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT