हृदयद्रावक : कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात सापडली भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेली अर्भकं

मुंबई तक

• 04:34 PM • 20 Apr 2023

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या (Chhatrapati Pramilaraje Government Hospital) आवारात भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेली 2 अर्भकं आढळून आली.

2 infants mauled by dogs were found in Chhatrapati Pramilaraje Government Hospital kolhapur

2 infants mauled by dogs were found in Chhatrapati Pramilaraje Government Hospital kolhapur

follow google news

कोल्हापूर : येथून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर येत आहे. येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या (Chhatrapati Pramilaraje Government Hospital) आवारात भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेली 2 अर्भकं आढळून आली. रुग्णालयाच्या आवारातील नागरिकांना हा प्रकार दिसताच त्यांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर सीपीआर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत यांनी दिली आहे. पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे. (2 infants mauled by dogs were found in Chhatrapati Pramilaraje Government Hospital kolhapur)

हे वाचलं का?

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (गुरुवार) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सीपीआर रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या खोलीशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांकडून मृत अर्भकाचे लचके तोडले जात असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांना दिली. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी येत मृत अर्भकांचा पंचनामा करुन विच्छेदन करण्यासाठी मृत अर्भक ताब्यात घेतले.

Satara Crime: सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतील मुलीवर लॉजवर लैंगिक अत्याचार

कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय हे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासह, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाचे रुग्णालय आहे. त्यामुळे इथे रुग्ण आणि नागरिकांची कायमच वर्दळ असते. इथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

दरम्यान, इथल्या प्रसुतीविभागत अनेकदा मृत अर्भक जन्माला येतात, तसेच गरज असलेल्या महिलांचे गर्भपातही केले जातात. त्यानंतर मृत अर्भक संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देवून योग्य ती विल्हेवाट लावण्यास सांगितले जाते. तर काही वेळा जैव वैद्यकीय कचरा गोळा करणार्‍या कंपनीकडेही ही मृत अर्भकं सोपवली जातात. त्यामुळे आज सापडलेली अर्भकं ही सीपीआर मधील आहेत की बाहेरची, याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती, डॉ. प्रदिप दिक्षीत यांनी दिली.

गुजरात दंगल: माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 68 आरोपींची निर्दोष सुटका

याशिवाय पोलीसही या घटनेची चौकशी करत आहेत. याबाबत अधिक माहिती विचारली असता, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर, त्या अर्भकांचं नेमकं वय किती, लिंग कोणते याची माहिती मिळेल, असं पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय कचऱ्यातून कुत्र्यांनी मृत अर्भक ओढून आणले असावे असा प्राथमिक अंदाजही काही पोलीस आणि रुग्णालायातील चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

    follow whatsapp