Crime: महिलेचे कपडे उतरवून केलं ड्रेसिंग, व्हिडीओ काढला अन्...; वॉर्डबॉयचं भयंकर कृत्य!  

मुंबई तक

18 Aug 2024 (अपडेटेड: 18 Aug 2024, 10:54 AM)

Crime News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बस्ती (Basti) जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका वॉर्डबॉयने महिलेला निर्वस्त्र करून तिचं ड्रेसिंग केलं आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेला निर्वस्त्र करून बनवला व्हिडीओ

point

उत्तर प्रदेशमध्ये वॉर्डबॉयचं भयंकर कृत्य

point

व्हिडीओ वॉर्डबॉयने व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवला होता.

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बस्ती (Basti) जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका वॉर्डबॉयने महिलेला निर्वस्त्र करून तिचं ड्रेसिंग केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने हे रुग्णालय सील केले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे. (crime news uttar pradesh news woman made to take off her clothes in hospital wardboy stripped her naked and dressed her video goes viral)

हे वाचलं का?

माहितीनुसार, महिला जेव्हा ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या वॉर्डबॉयने तिचे कपडे काढले आणि ड्रेसिंग करताना तिचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ त्याने व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवला होता. तिथून तो व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना बस्ती शहरातील 'बस्ती केअर मल्टीस्पेशालिटी' या खासगी रूग्णालयात घडली.

हेही वाचा : Maharashtra Weather: वादळ, सोसाट्याचा वारा... हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा!

महिलेला निर्वस्त्र करून बनवला व्हिडीओ

आरोपी वॉर्डबॉयने पोलिसांना सांगितल्यानुसार, रुग्णालयाचे संचालक डॉ. संजय गौतम यांच्या सांगण्यावरून त्याने महिलेचं ड्रेसिंग केलं होतं. तर, सीएमओ आरएस दुबे यांनी सांगितले की, एसीएमओच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून संपूर्ण घटनेचा तपास करण्यात आला. घटनास्थळी पथकाने रुग्णालयाची संपूर्ण तपासणी केली, त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आणि अहवालाच्या आधारे सीएमओने तत्काळ कारवाई करत प्रथम रुग्णालयाची नोंदणी निलंबित करून रुग्णालय सील केले.

हेही वाचा : Rajendra Shingne : ''बँकेच्या अडचणीमुळे नाइलाजाने अजितदादांसोबत गेलो...'', पवारांचा आमदार 'हे' काय बोलून गेला

 

याशिवाय मुख्य वैद्यकीय अधिकारी रामशंकर दुबे यांनी ही लज्जास्पद घटना असल्याचे सांगितले. तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. हा व्हायरल व्हिडीओ बराच जुना असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.


 

    follow whatsapp