आधी वर्ल्ड कप टीममधून डच्चू, आता पत्नीकडूनही… शिखर धवनच्या आयुष्यात मोठं वादळ

मुंबई तक

05 Oct 2023 (अपडेटेड: 05 Oct 2023, 12:08 PM)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शिखर धवनने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला असून पत्नीने केलेले आरोपही त्याने फेटाळले नाहीत. मात्र त्यानेही न्यायालयाला सांगितले की, पत्नीने मला प्रचंड मोठा मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे मी एक मानसिक क्रुरतेचा बळी ठरल्याचे त्याने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

shikhar dhawan divorced wife ayesha mukherjee. family court permission visit son dhawan victim mental cruelty

shikhar dhawan divorced wife ayesha mukherjee. family court permission visit son dhawan victim mental cruelty

follow google news

Shikhar Dhawan: क्रिकेटर शिखर धवनच्या आयुष्यातील एका घटनेने त्याला मोठा धक्का बसला आहे. कारण त्याची पत्नी आयेशा मुखर्जीने (Ayesha Mukherjee) त्याच्यापासून आता घटस्फोट (Divorce) घेतला आहे. दिल्लीमधील पटियाला हाऊस परिसरातील कौंटुंबिक न्यायालयाने (Family Court) शिखर धवनच्या घटस्फोटला मंजूरी दिली आहे. शिखर धवनच्या पत्नीने त्याला त्याच्या एकुलता एक मुलाला त्याच्यापासून वर्षभर दूर ठेवण्याचे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

आरोपांना विरोध नाही

शिखर धवनच्या पत्नीने घटस्फोटाच्या तक्रारीत केलेले सर्व आरोप कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी धवनवर केलेले सर्व आरोप त्यांनी मान्य केले आहेत. तर शिखर धवनवर त्याच्या बायकोने केलेले आरोपानाही त्याने विरोध केला नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र घटस्फोट देताना न्यायालयाकडून सांगण्यात आले की, पत्नीने केलेले आरोप धवनला खोडून काढता आले नाहीत. तसेच त्याने स्वतःचा बचावही केला नाही. मात्र धवनकडूनही घटस्फोटासाठी केलेल्या अर्जामध्ये आपल्या पत्नीने माझा प्रचंड मानसिक छळ केला आहे.

हे ही वाचा >> NCP : शरद पवारांचा एक खासदार झाला कमी, ECI सुनावणी आधीच कोर्टात झटका!

मुलाला भेटू शकतो

मानसिक क्रुरतेचा मी एक बळी असल्याचेही त्याने म्हटले आहे. मुलाला कायमस्वरुपी ताब्यात देण्याबात मात्र न्यायालयाकडून शिखर धवनला नकार देण्यात आला आहे. मात्र यावेळी न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे की, धवनला आपल्या मुलाची भेट घेण्याचा आणि भारत ऑस्ट्रेलियामध्ये काही कालावधीसाठी व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्याबरोबर बोलण्याचा अधिकार त्याला दिला आहे.

पत्नीलाही आदेश

शिखर धवनला आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्याच्या पत्नीलाही सांगण्यात आले आहे की, शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आणि त्याला त्याच्यासोबत राहण्यासाठी व रात्रीचा मुक्काम करण्यासाठी त्याला भारतात घेऊन येण्याचेही पत्नीला आदेश दिले आहेत.

हे ही वाचा >> Gold Price Today : सोनं झालं खूपच स्वस्त… किती रुपयांनी घसरल्या किंमती?

जबाबदार वडील

न्यायालयाकडून हा घटस्फोट मान्य केला असला तरी शिखर धवन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. तसेच तो नागरिक आणि एक जबाबदार वडिल म्हणूनही त्याला काही अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा आदेश देताना त्या दोघांच्या मुलाला त्याच्या कुटुंबामध्ये राहण्याचा त्याचा हक्क लक्षात घेऊनच हा निर्णय दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    follow whatsapp