नवी दिल्ली: महाकुंभामुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला आता मोठा धक्का बसला आहे. प्रयागराजमध्ये नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्यात हार विकणारी मोनालिसा चित्रपटातील नायिका होण्याचे स्वप्न पाहत होती. मोनालिसाच्या मेकओव्हरचे, विमान प्रवासाचे आणि महागड्या हॉटेल्समध्ये स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्याचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. या फोटोंमध्ये दिग्दर्शक सनोज मिश्रा देखील उपस्थित होते, ज्यांनी तिला चित्रपटात अभिनेत्री बनवण्याची ऑफर दिली होती. सध्या सनोज मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
सनोज मिश्रा यांच्यावर यापूर्वीही कास्टिंग काउचचे आरोप झाले आहेत. मोनालिसासोबत चित्रपट बनवण्याची घोषणा केल्यानंतर, सनोज मिश्रा अनेक लोकांच्या लक्ष्य बनले. मग त्यांच्या कथा एकामागून एक बाहेर येऊ लागल्या. अखेर पोलिसांनी त्याला बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. सनोज मिश्रा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
हे ही वाचा>> उज्ज्वल-नीलूची चक्रावून टाकणारी कहाणी, फ्लॅटमध्येच Porn कंटेंट; मुलींसोबत अश्लील शूटिंगआधी...
सनोज मिश्राने वारंवार बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप
एका छोट्या शहरातील एका मुलीवर, जी अभिनेत्री बनू इच्छित होती, तिच्यावर सनोज मिश्राने अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने आरोप केला आहे की, ती 2020 मध्ये सोशल मीडिया टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर सनोज मिश्राला भेटली होती. त्यावेळी फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि दोघे काही वेळ बोलत राहिले. त्यानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी 17 जून 2021 रोजी फोन करून सांगितले की तो झाशी रेल्वे स्टेशनवर पोहोचला आहे. यावेळी सनोज तिला भेटण्याचा आग्रह करत होता.
पीडितेचा दावा- सनोजने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले
जेव्हा पीडितेने सांगितले की, ती त्याला भेटू शकत नाही. जेव्हा तिने गावातील समाजाच्या दबावाबद्दल आणि समाजात ते चांगले मानले जात नाही याबद्दल सांगितलं तेव्हा सनोजने आत्महत्या करेन अशी धमकीही तरुणीला दिली होती. अखेर पीडिता त्याला भेटायला पोहोचली. दुसऱ्या दिवशी, 18 जून 2021 रोजी, आरोपीने तिला पुन्हा फोन करून रेल्वे स्टेशनवर बोलावले. तेथून सनोजने तिला एका रिसॉर्टमध्ये नेले आणि तिला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. असा आरोप त्याचावर करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलूला देशी पॉर्नसाठी मुली कुठून मिळायच्या, कसं करायचे शूटिंग?
आरोपींनी आक्षेपार्ह फोटो काढले आणि दिली धमकी
पीडितेने एफआयआरमध्ये सांगितले की, आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले. त्याने धमकी दिली की जर तिने विरोध केला तर तो या गोष्टी सार्वजनिक करेल. यानंतर त्याने तिला लग्नाच्या बहाण्याने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याने तिला चित्रपटात काम देण्याचे आमिषही दाखवले होते.
या आशेने पीडिता मुंबईत आलेसी आणि आरोपीसोबत राहू लागलेली. पण तिथेही आरोपी तिचे शोषण करत राहिला आणि तिला अनेक वेळा मारहाणही करत राहिला. पीडितेचा आरोप आहे की, आरोपीने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले. फेब्रुवारी 2025 मध्ये, आरोपीने तिला सोडून दिले आणि धमकी दिली की, जर तिने काही तक्रार केली तर तो तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करेल. या प्रकरणात, आता दिल्ली पोलिसांनी सनोजला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
