चरखी-दादरी (हरियाणा): हरियाणातील चरखी दादरी येथे बुधवारी रात्री IAS विवेक आर्य यांच्या आजी-आजोबांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे भयानक पाऊल उचलण्यापूर्वी वृद्ध दाम्पत्याने सुसाईड नोटही लिहिली होती. पोलिसांनी दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Grandparents of IAS officer committed suicide, handed over suicide note to police before death)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, 78 वर्षीय जगदीश चंद्र आर्य आणि 77 वर्षीय भागली देवी, मूळचे गोपी येथील रहिवासी त्यांचा मुलगा वीरेंद्र आर्यसोबत राहत होते. वीरेंद्र यांचा मुलगा विवेक आर्य 2021 मध्ये IAS झाला. त्याला हरियाणा केडर मिळाले असून तो सध्या प्रशिक्षणार्थी आहे.
अधिक वाचा- मृत्यूपूर्वी आकांक्षा पार्टीत खुश होती; नंतर असं काय झालं की तिने आत्महत्या केली?
दरम्यान, बुधवारी रात्री जगदीश चंद्र आणि त्यांच्या पत्नीने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. येथे जगदीश यांनी सुसाईड नोट पोलिसांना दिली. वृद्ध दाम्पत्याची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठविण्यात आले. मात्र, येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
सुसाईड नोटमध्ये वृद्ध जोडप्याने लिहिल्या ‘या’ गोष्टी
जगदीश यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी जगदीश चंद्र आर्य तुम्हाला माझी व्यथा सांगतो. माझ्या मुलाची बाढडा येथे 30 कोटींची संपत्ती आहे, पण त्याच्याकडे मला पुरेसं अन्न देण्यासाठी पैसे नाहीत. मी माझ्या धाकट्या मुलासोबत राहत होतो. पण 6 वर्षांपूर्वी तो मरण पावला. त्याच्या पत्नीने आम्हाला काही दिवस सांभाळलं, पण नंतर ती चुकीचे काम करू लागली. मी विरोध केल्यावर तिने मारहाण करून आम्हाला घरातून हाकलून दिलं.”
अधिक वाचा- विकृत नवरा.. बायकोचे बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ केले शेअर, कारण…
“मी दोन वर्षे अनाथाश्रमात राहिलो. मी परत आलो तेव्हा त्यांनी घराला कुलूप लावले होते. या काळात माझ्या पत्नीला अर्धांगवायू झाला आणि आम्ही दुसऱ्या मुलाकडे राहू लागलो. पण काही दिवसानंतर त्यांनीही आम्हाला ठेवून घेण्यास नकार दिला आणि आम्हाला शिळे अन्न देण्यास सुरुवात केली. हे गोड विष आम्ही किती दिवस खायचं? म्हणून मी सल्फासची गोळी खाल्ली. माझ्या मृत्यूचे कारण म्हणजे माझ्या दोन सुना, एक मुलगा आणि एक भाचा आहे.”
“या चौघांनी माझ्यावर जेवढे अत्याचार केले तसे अत्याचार कोणत्याही मुलांनी आपल्या आई-वडिलांवर करू नये. माझे ऐकणाऱ्यांना विनंती आहे की, असा अत्याचार पालकांवर करू नका. सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्याकडे बँकेत दोन एफडी आहेत आणि बाढडा येथे दुकान आहे, ते आर्य समाज बाढडाला द्यावेत.” असे भयंकर आरोप जगदीश यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये केले आहेत.
मुलगा म्हणाला, ‘..म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले’
याप्रकरणी मृत जगदीश यांचा मुलगा वीरेंद्र याने सांगितले की, विष प्राशन केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. वयाच्या या टप्प्यावर दोघेही आजारपणामुळे त्रस्त होते. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
अधिक वाचा- Palghar: बॉयफ्रेंडला झाडाला बांधलं अन् गर्लफ्रेंडवर केला गँगरेप
दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी डीएसपी वीरेंद्र श्योराण यांनी सांगितले की, जगदीश चंद्र यांनी एका खासगी रुग्णालयात पोलिसांना पत्र दिले होते. ही सुसाईड नोट मानली जाऊ शकते. कुटुंबीयांचा छळ होत असल्याचा आरोप करत मृताने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याचवेळी, मृताचा नातू आयएएस अधिकारी असून सध्या प्रशिक्षणार्थी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT