ED Raid in Noida Exposes Porn Video Scam: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी नोएडामधील एका जोडप्याच्या (उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव) घरावर छापा टाकला. दोघांवरही मॉडेल्ससोबत आपल्या स्वत:च्या घरात अडल्ट व्हिडिओ शूट केल्याचा आणि ते व्हिडिओ आंतरराष्ट्रीय पोर्नोग्राफिक वेबसाइट चालवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सायप्रस येथील कंपनीला पुरवल्याचा आरोप आहे. Subdigi Ventures Private Limited आणि त्यांच्या प्रमोटर्स विरुद्धच्या चौकशी संदर्भात परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये 8 लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे केंद्रीय तपास संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.
ADVERTISEMENT
सायप्रस मधील कंपनीशी सुरू होता व्यवहार
ही कंपनी या जोडप्याच्या नियंत्रित केली जात होती. असा आरोप आहे की, दोघेही त्यांच्या घरातून एक अडल्ट वेबकॅम स्ट्रीमिंग स्टुडिओ चालवत होते आणि हे व्हिडिओ सायप्रस येथील Technius Limited नावाच्या कंपनीसोबत शेअर करत होते. ईडीच्या मते, Technius Limited ही Xhamster आणि Stripchat सारख्या पॉर्न वेबसाइट्सची ऑपरेटर आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलू 'या' वेबसाइट्ससाठी घरातच बनवायचे पॉर्न, मॉडेल्सला द्यायचे 'एवढी' रक्कम!
15.66 कोटी रुपयांचा बेकायदेशीर निधी
"जाहिरात, मार्केट रिसर्च आणि जनमत सर्वेक्षण यासारख्या सेवांच्या स्वरूपात Subdigi Ventures आणि त्यांच्या संचालकांच्या खात्यांमध्ये परदेशी पैसे नियमितपणे येत होते," असे ईडीने म्हटले आहे. तथापि, हे पैसे Xhamster वर स्ट्रीम केलेल्या अडल्ट व्हिडिओमधून मिळालेले असल्याचे मानले जात आहे.
ईडी सूत्रांचे म्हणणे आहे की, हे FEMA चे उल्लंघन आहे. कारण हा पैसा अडल्ट कंटेंट सेवेसाठी दिले जात होते, जे भारतात बेकायदेशीर आहे.
हे ही वाचा>> Crime News: हॉटेलमध्ये सेक्स करताना तरुणीचा मृत्यू! गुजरातमध्ये हे काय घडलं?
तपासात असे दिसून आले की, वरील कंपनी आणि तिच्या संचालकांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 15.66 कोटी रुपये बेकायदेशीरपणे पाठवण्यात आले होते, तसेच नेदरलँड्समधील एका "अघोषित" बँक खात्यात Technius Limited ने सुमारे 7 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. परदेशी बँक खात्यात आलेले हे पैसे आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डद्वारे भारतात रोखीने काढले जात होते.
ईडीच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर आमिष दाखवत असे. जाहिरातींद्वारे मॉडेल्सची भरती केली जात आणि त्यांना मोठ्या कमाईच्या आमिषाने पॉर्न व्यवसायात ढकलले जात होते. दरम्यान, अडल्ट व्हिडिओंमधून मिळणाऱ्या कमाईपैकी 25% रक्कम मॉडेल्सना देण्यात यायची.
ADVERTISEMENT
