Kalyan crime : पत्नी आणि मुलाच्या हत्येचं कारण आलं समोर, घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले!

मिथिलेश गुप्ता

02 Dec 2023 (अपडेटेड: 02 Dec 2023, 03:10 PM)

दीपक गेल्या सहा वर्षांपासून एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालला, तेव्हा तो कर्मचाऱ्यांना चांगला पगारही देत ​​होता.

kalyan crime news businessman killed his wife and son crime news

kalyan crime news businessman killed his wife and son crime news

follow google news

Kalyan Crime News : कल्याणमध्ये शुक्रवारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. या घटनेत नवऱ्यानेच क्रुरपणे त्याच्या बायको आणि मुलाची गळा दाबून हत्या केली होती. या हत्याकांडानंतर आरोपी नवरा फरार झाला होता. त्यामुळे या घटनेत आरोपीने त्याच्या बायको आणि मुलाची हत्या का केली असावी? असा प्रश्न पडला होता. अखेर या हत्येच गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. (kalyan crime news businessman killed his wife and son crime news)

हे वाचलं का?

कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर 3 येथील ओम दिपावली इमारतीत दीपक गायकवाड हा त्याची बायको अश्विनी गायकवाड आणि 7 वर्षाचा मुलगा अदिराज गायकवाड सोबत राहतो. शुक्रवारी दुपारी त्याने पत्नी अश्विनी आणि 7 अदिराजची गळा दाबून हत्या केली होती. या घटनेनंतर दीपक गायकवाडने नातेवाईकांना फोन करुन पत्नी आणि मुलाच्या हत्येची माहिती दिली होती तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांसह घर गाठले असता त्यांना घटनास्थळी पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता.

हे ही वाचा : Sharad Pawar चा प्रफुल्ल पटेलांच्या वर्मावरच ‘बाण’! म्हणाले, “ईडीने घर का ताब्यात घेतलं?”

या हत्याकांडानंतर दिपक गायकवाड फरार झाला होता. मात्र आता पोलिसांनी त्याला संभाजीनगरमधून अटक केली होती. या अटकेनंतर मृत अश्विनीच्या कुटूंबियांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपी दीपकवर कठोर कारवाई होत नाही तिथपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता.

अश्विनीला करायचा मारहाण

दीपक हा अश्विनीला मारहाण करून तिच्याकडून पैशाची मागणी करायचा, अनेकदा त्याला पैसे देखील दिले, मात्र त्याचा त्रास हा सुरूच होता असे मृत अश्विनीचा भावाने सांगितले. कल्याणमध्ये फायनान्स कंपनी सुरू केली होती. यात लोकांनी करोडो रुपये गुंतवले होते. त्यात नुकसान झाले होते अशी चर्चा सुरू आहे. मात्र इतक्या निर्दयपणे त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याने संताप व्यक्त केला जातोय.तसेच दीपकला महागड्या गाड्यांची आवड होती, नुकतीच त्याने 40 लाख रुपयांची महागडी कार ( MG Hector ) खरेदी केली होती. याशिवाय त्याच्याकडे लाखो रुपयांची मोटारसायकल होती.

हे ही वाचा : Babanrao Lonikar : राजेश टोपेंची गाडी का फोडली? भाजप नेते लोणीकरांनी सांगितलं कारण

‘या’ कारणामुळे हत्येचा कट रचला

दीपक गेल्या सहा वर्षांपासून एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालला, तेव्हा तो कर्मचाऱ्यांना चांगला पगारही देत ​​होता. दीपकने दोन नवीन ऑफिस उघडवून स्वतः बिझनेस सुरू केले. त्याचा ऑफिसमध्ये शंभर कर्मचारी काम करत होते. त्यांनाही चांगला पगार देत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या फायनान्स बिझनेसमध्ये खूप तोटा होत असल्याने तो खूप अस्वस्थ होता, त्यामुळे दीपकने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

    follow whatsapp